Tarun Bharat

एमएलआयआरसीमधून प्रशिक्षणार्थी जवान बेपत्ता

कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी /बेळगाव

येथील मराठा लाईट इन्फंट्री (एमएलआयआरसी)मधील एक प्रशिक्षणार्थी जवान दोन दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. या संबंधी कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अरबाजअली दस्तगीरसाब नदाफ (वय 21, रा. नेर्ली, ता. हुक्केरी) असे त्या जवानाचे नाव आहे. शुक्रवारी 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 पासून तो बेपत्ता झाला आहे. रोलकॉल सुरू असताना अरबाजअली बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे.

यासंबंधी हवालदार शिवाजी देसाई यांनी शुक्रवारी रात्री कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. लष्करात भरती झाल्यानंतर सध्या अरबाजअलीचे प्रशिक्षण सुरू होते. वरि÷ अधिकाऱयांकडून परवानगी किंवा रजा न घेता तो तेथून निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रशिक्षणार्थी जवानाविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405234 या क्रमांकावर पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

हलगा, कलईगार गल्ली परिसरात मटका अड्डय़ांवर छापे

Patil_p

भटक्या जनावरांना अन्न घालणाऱयांमध्ये धास्ती

Amit Kulkarni

हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत कडोली संघ विजेता

Amit Kulkarni

बन्नंजे राजासह आठजणांना जन्मठेप

Tousif Mujawar

आणखी 128 जणांचे स्वॅब तपासणीला रवाना

Patil_p

कुकर बॉम्ब ब्लास्टचे गूड उघडकीस

mithun mane