शेतकऱयांच्या हितासाठी दुप्पट उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले आहे. धान्य खरेदीवर भर देण्याचा निर्धारही व्यक्त केला. 2013-14 मध्ये गव्हावर सरकारने 33 हजार कोटी रुपये खर्च केले, 2019 मध्ये हा आकडा 75 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 2020-21 मध्ये 43 लाख शेतकऱयांना याचा फायदा झाला. 2014 मध्ये डाळींच्या खरेदीसाठी 236 कोटी रुपये खर्च झाले. यावषी आम्ही 10 हजार 500 कोटींची खरेदी झाली. स्वामित्व योजना देशभरात लागू करण्यात आली आहे. ऑपरेशन ग्रीन स्कीम योजनेची सीतारामन यांनी घोषणा केली. यात अनेक पिकांचा समावेश करण्यात येईल आणि शेतकऱयांपर्यंत लाभ पोहोचवला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे.


previous post