Tarun Bharat

एमजी मोटर्सची ऍस्टर याच महिन्यात

पहिलीवहिली पर्सनल एआययुक्त गाडीः ऑटोनॉमस तंत्रज्ञानाची जोड

वृत्तसंस्था /मुंबई

दिग्गज वाहन निर्माती कंपनी एमजी मोटर इंडियाने आपल्या नव्या एमजी ऍस्टर गाडीच्या लाँचिंगबाबतचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले आहे. कंपनीची ही पहिलीवहिली पर्सनल एआय (ऑर्टिफिशल इंटेलिजन्स) असिस्टंटची व ऑटोनॉमस (लेव्हल 2) तंत्रज्ञानाचीही पहिली कार असणार आहे, असे स्पष्ट केले आहे.

सदरच्या गाडीबाबत अलीकडच्या काळात चर्चा सुरू होती. पण कधी दाखल होणार याबाबत स्पष्टता मात्र नव्हती. अखेर मौनातून बाहेर पडून कंपनीने सदरच्या गाडीबाबतची माहिती दिली आहे. सदरच्या गाडीत अनेकविध वैशिष्टय़े भरलेली असणार आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सदरची गाडी येत्या 19 सप्टेंबरपासून एमजी शोरुम्समध्ये ठेवली जाणार असून त्या दिवसापासून गाडी बुकिंगला सुरुवात होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

वैशिष्टय़े

  • आय स्मार्ट तंत्रज्ञानासह 80 हून अधिक इंटरनेट फिचर्स
  • जियो सावन ऍपवर संगीताची सुविधा
  • विकीपिडीयाचा करता येईल वापर
  • इंजिन- बिट डायनॅमिक 220 टर्बो पेट्रोल
  • मॅन्युएल ट्रान्समिशन- व्हीटीआय टेक
  • पर्सनल (वैयक्तिक) आर्टिफिशल इंटेलिजन्स
  • ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम
  • एअरबॅग्ज

Related Stories

वीजेवर चालणारी तीनचाकी सादर

Amit Kulkarni

फास्ट चार्जिंगची ट्रीटॉन इलेक्ट्रिक कार दाखल

Amit Kulkarni

भारतात बीएमडब्ल्यूची इलेक्ट्रिक सेडान आय 4 दाखल

Amit Kulkarni

नवी कोरी रेनॉ डस्टर बाजारात

Patil_p

एप्रिलमध्ये फोर्स मोटर्सने विकली 66 वाहने

Patil_p

ऍथरची डिसेंबरपर्यंत मोफत चार्जिंगची सुविधा

Amit Kulkarni
error: Content is protected !!