Tarun Bharat

एमजी मोटर्सची नवी ‘हेक्टर प्लस’ जानेवारीत

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी एमजी मोटर्स आपली 7 जण बसतील अशा सोयीची आरामदायी ‘हेक्टर प्लस’ पुढच्या वषीच्या प्रारंभी लाँच करण्याची तयारी करते आहे. जानेवारीतच ही गाडी भारतीय ग्राहकांना खरेदी करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी ब्रिटनमधील ऑटोमोबाईल कंपनीने सहा जण बसतील अशी गाडी ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली होती. भारतीय बाजारात हेक्टर प्लस ही त्यांची नवी आरामदायी कार जानेवारीमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध केली जाणार असल्याचे समजते.  7 सीटर हेक्टर प्लसची किंमत 13 लाख ते 18 लाखाच्यावर असेल. गाडीमध्ये सातवी सीट मध्यभागी रचण्यात आली आहे.  ही नवी गाडी अखेर नव्या वर्षारंभीच घेण्याची संधी ग्राहकांना साधता येणार आहे.

Related Stories

टोयोटा भारतातला विस्तार गुंडाळणार

Patil_p

देशातील टॉप 10 कार्सच्या यादीत मारुती सुझुकी अव्वल

Patil_p

मारूती सुझुकीची नवी सेलेरियो दाखल

Patil_p

बाऊन्स इनफिनिटीची इलेक्ट्रिक स्कूटर डिसेंबरमध्ये येणार

Patil_p

होंडा मोटारसायकल्सवर सवलत

Patil_p

टाटा टीयागो ईव्हीच्या बुकिंगला दमदार प्रतिसाद

Patil_p
error: Content is protected !!