Tarun Bharat

एमजी मोटारने विकल्या 710 कार्स

नवी दिल्ली 

 एमजी मोटार इंडियाने लॉकडाऊनच्या काळातही काही प्रमाणात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीने मे महिन्यात एकूण 710 कार्सची विक्री केली आहे. कंपनीने आपल्या हलोल येथील प्रकल्पात जवळपास 30 टक्के क्षमतेच्या जोरावर आपले उत्पादन पुन्हा सुरु ठेवले आहे. कंपनीने देशभरात जवळपास 65 शोरुम्स उघडली आहेत. संबंधीत ठिकाणी कार्यक्षमतेत वाढ करत कार्सची विक्री समाधानकारक केली आहे.  लॉकडाऊनमुळे विक्री केंद्रे खुली केलेली नव्हती आता नियमावलीनुसार केंद्रे सुरू केली आहेत. पूणे, सुरत, कोच्ची, चंदीगड, जयपूर आणि चेन्नई या ठिकाणी कंपनीने विस्तार योजना आखली असल्याचे विक्री संचालक राकेश सिदान यांनी म्हटले आहे.

Related Stories

रियल इस्टेट, ऊर्जा क्षेत्रातील विक्री : बाजार घसरणीत

Amit Kulkarni

एलआयसीचे समभाग वधारले

Patil_p

टोमॅटो चे दर गगनाला! का महागले टोमॅटो वाचा सविस्तर….

Archana Banage

5 जी नेटवर्क प्रवासात ऍपलचा होणार समावेश

Patil_p

डाबर इंडियाचा नफा पोहचला 504 कोटी रुपयांवर

Patil_p

नेस्लेच्या उत्पादनांना छोटय़ा शहरात प्रतिसाद

Patil_p