Tarun Bharat

“एमटीडीसी”च्या कामांची चौकशी करा- संजू परब यांची किरीट सोमय्यांकडे मागणी

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या कामातील भ्रष्टाचारात केसरकर यांचा सहभाग

सावंतवाडी/ प्रतिनिधी-

सावंतवाडी शहरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अतर्गत कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारात आमदार दीपक केसरकर यांचा सहभाग आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रश्नी आपण लक्ष घालू असे आश्वासन सोमय्या यांनी दिले आहे.

सावंतवाडी शहरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची कामे करण्यात आली आहेत. शिवउद्यान मधील गार्डन मध्ये खेळणी, हेल्थ फार्ममध्ये एसी व अन्य कामे मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी ही कामे मंजूर करून दिली होती. त्यामुळे त्यांचा ह्या भ्रष्टाचारात सहभाग आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी आपण पंधरा ऑगस्ट उपोषण छेडले तसेच जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचेही लक्ष वेधले होते. त्यांनी याबाबत कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते पण अद्याप पण कोणतीही चौकशी अथवा कार्यवाही झालेली नाही त्यामुळे आपण याप्रश्नी लक्ष घालावा असे परब यांनी निवेदनात म्हटले आहे.

यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावले, बंटी पुरोहित, सत्यवान बांदेकर, हेमंत बांदेकर आदी उपस्थित होते

Related Stories

कलंबिस्त मध्ये सात लाखांची दारू जप्त एका दुकानाच्या गाळ्यात सापडली दारू

NIKHIL_N

नाणार सोडून कुठेही रिफायनरी होऊ शकते!

Patil_p

वाघिवरे मोहल्ल्यात गोवंश हत्या करणाऱ्या चौघांना रंगेहात पकडले

Archana Banage

मालवण आगाराच्यावतीने स. का. पाटील कॉलेजपर्यंत बस फेऱ्या

Anuja Kudatarkar

घर कोसळून एक ठार : तीन जखमी

Patil_p

सावंतवाडी मतदारसंघाचा विकास करू

NIKHIL_N