Tarun Bharat

एमपीएल स्पोर्टस् भारतीय संघाचे नवे किट प्रायोजक

Advertisements

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची घोषणा, गांगुली-शाहकडून एमपीएलचे स्वागत

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

एमपीएल स्पोर्टस् ही ई-स्पोर्टस् प्लॅटफॉर्म कंपनी भारतीय संघासाठी नवे किट प्रायोजक व अधिकृत मर्चंडाईज पार्टनर असतील, अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी केली. बीसीसीआय व एमपीएल यांच्यात यासाठी 3 वर्षांचा करार झाला असून त्यानुसार नोव्हेंबर 2020 ते डिसेंबर 2023 हा त्याचा कालावधी असेल. भारताच्या आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपासून या कराराची अंमलबजावणी सुरु होईल. नव्या करारानुसार, पुरुष, महिला व 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघांना एमपीएल स्पोर्ट्स अकादमीने डिजाईन व उत्पादित केलेल्या जर्सी पुरवल्या जाणार आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यापूर्वी किट प्रायोजक व अधिकृत मर्चंडाईज पार्टनर हक्कासाठी निविदा मागवल्या होत्या. यंदा सप्टेंबर महिन्यात नायके कंपनीचा करार संपुष्टात आल्यानंतर या प्रक्रियेला नव्याने सुरुवात केली गेली होती.

‘भारतीय संघासाठी व मर्चंडायजिंगसाठी आम्ही एमपीएल स्पोर्टस् कंपनीचे भारतीय क्रिकेट वर्तुळातर्फे मनापासून स्वागत करतो. भारतीय क्रिकेट चाहत्यांना अव्वल दर्जाचे साहित्य उपलब्ध करुन दिले जावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. केवळ भारतातील नव्हे तर जागतिक स्तरावरील भारतीय चाहत्यांना एमपीएल निर्मित साधने निश्चितपणाने पसंतीस उतरतील, असा विश्वास वाटतो. या करारान्वये भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात होत आहे’, असे बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले.

बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनीही या कराराची घोषणा करताना एमपीएलचे स्वागत केले. ‘आम्हाला हा करार घोषित करताना अतीव आनंद होत आहे. 2023 पर्यंत एमपीएल भारतीय पुरुष, महिला व 23 वर्षाखालील वयोगटातील संघांचे प्रायोजक व अधिकृत मर्चंडाईज असतील’, असे ते म्हणाले. एमपीएल कंपनी ही आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर या क्लब संघांशी देखील करारबद्ध आहे.

Related Stories

भारत-पाक हॉकी लढत 23 मे रोजी

Amit Kulkarni

बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद यांची 26 लाखांची मदत

Patil_p

जेतेपदासाठी बायर्नला एका विजयाची गरज

Patil_p

झिम्बाब्वे, न्यूझीलंड मालिकांसाठी पाकचे 35 खेळाडू जाहीर

Patil_p

वरुण चक्रवर्ती तंदुरुस्ती चाचणीत नापास

Patil_p

भाविनाने कोरले ‘रौप्य’ पदकावर नाव

datta jadhav
error: Content is protected !!