Tarun Bharat

एमपीएससी परिक्षेला अखेर मुहुर्त मिळाला

Advertisements

रविवार दि. 11 रोजी संपुर्ण राज्यात विविध केंद्रांवर होणार परिक्षा

प्रतिनिधी/ सातारा

 मागील वर्षभरापासुन कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या एमपीएससी परिक्षेला अखेर मुहुर्त मिळाला आहे. रविवार दि. 11 रोजी ही परिक्षा जिल्हय़ातील एकुण 39 केंद्रांवर होणार आहे. यंदा एकुण 16 हजार 80 विद्यार्थ्यांनी या परिक्षेकरीता अर्ज केला आहे. सातारा, कोरेगांव, कराड व वाई या चार केंद्रांवर ही परिक्षा होणार आहे.

 यंदा साताऱयात एकुण 22 केंद्रे या परिक्षार्थी करीता आहेत. जिल्हय़ात सर्वाधिक परिक्षा केंद्रे ही सातारा शहरातच आहेत. प्रत्येक केंद्रात अधिकाधिक 20 वर्ग खोल्यांमध्ये जवळपास 480 विद्यार्थ्यांना सोशियल डिस्टंसिंगचे पालन करत परिक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना हॉलटिकीट हे संबंधीत वेबसाईटवर उपलब्ध आहे. परिक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना कोरोना बाबतच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये विशेष म्हणजे मास्कचा वापर, सॅनेटाझर व सोशल डिस्टंसिंग चा वलंब करणे बंधनकारक आहे. कोरोना बाबत शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन व्हावे याकरीता ‘इनोव्हेटीव’ या संस्थेची नेमनुक करण्यात आली आहे.

 याअंतर्गत प्रत्येक केंद्रावर कोणतेही अनुचीत प्रकार होऊ नयेत याकरीता पुरवठा अधिकारी व कर्मचाऱयांची नेमनुक ही करण्यात आली आहे. सध्या साताऱयात लाकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे यापरिक्षा होणार की पुन्हा पुढे ढकलण्यात येणार याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्ता होती. पण आता या सर्वांना पुर्णविराम मिळला असुन येत्या रविवारी ही परिक्षा होणार आहे.

 सातारा शहरातील परिक्षा केंद्रे

 कन्या शाळा-भवानी पेठ, लालबहाद्दूर शास्त्री कॉलेज-मल्हार पेठ, महाराजा सयाजीराव विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज-पोवई नाका, न्यू इंग्लिश स्कुल-सोमवार पेठ, यशोदा टेक्निकल कँम्पस, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग-वाढे फाटा, यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ुट ऑफ सायन्स-सदरबाझार कँम्प, अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग-पानमळेवाडी, धनंजयराव गाडगीळ कॉमर्स कॉलेज-बुधवार पेठ, पोदार इंटरनॅशनल स्कूल-तामजाई नगर करंजे पेठ, भारत विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज-कोडोली, छत्रपती शाहू ऍकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज-विसावा नाका, भवानी विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज-मल्हार पेठ, कला व वाणिज्य महाविद्यालय -शुक्रवार पेठ, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग-सदरबाझार, श्रीपतराव पाटील हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज-करंजेपेठ, भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदिर-पोवई नाका व छत्रपती शिवाजी कॉलेज-सदरबाझार, कँम्प

Related Stories

तापमान 18 अंशाच्या खाली

Patil_p

संभाजीराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवले सूचना – निरीक्षण पत्र

Archana Banage

102 व्या घटनादुरूस्तीमुळे निर्माण झालेला मराठा आरक्षण सुनावणीतील संभ्रम दूर करा

Archana Banage

लोणंद-फलटण महामार्गावरील भीषण अपघात दोन ठार

Patil_p

जिल्ह्यात नव्याने ४२ कोरोना बाधित, रामवाडी येथील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यु

Archana Banage

कराडला विनाकार फिरणारांची तपासणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!