Tarun Bharat

‘एमबीबीएस-फायनल’चे विद्यार्थी कोविड सेवेत ?

Advertisements

आढावा बैठकीत चर्चा-आज अंतिम निर्णय अपेक्षित

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशातील सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आरोग्य तज्ञांशी व्हर्च्युअल बैठक घेतली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी कोरोनायोद्धय़ांची संख्या वाढविण्याच्या दृष्टेने विविध आरोग्य विभागांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आकडय़ांचा आढावा घेतला. त्यानुसार सध्या नर्सिंगमधील एमबीबीएस आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कोविड योद्धे म्हणून सेवा करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच वैद्यकीय प्रवेश परीक्षा (एनईईटी) पुढे ढकलण्यासंबंधी चर्चा झाली. त्यानुसार उपरोक्त निर्णयांची अंतिम घोषणा केंद्र सरकारकडून सोमवारी म्हणजे आज होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने सध्याच्या आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळावर प्रचंड ताण आलेला आहे. हा ताण कमी करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या दिमतीला शिकाऊ डॉक्टर पुरविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने एमबीबीएस अंतिम वर्षाची परीक्षा लवकरच घेतली जाऊ शकते. त्यानंतर सदर विद्यार्थ्यांना कोविड सेवेमध्ये सामावून घेतल्यास जास्तीत जास्त आरोग्य कर्मचारी तैनात होतील, असे मत बैठकीमध्ये चर्चेदरम्यान मांडण्यात आले. कोविड सेवेमध्ये सामावून घेत या विद्यार्थ्यांना सरकारकडून प्रोत्साहन दिले जाईल. मात्र, अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

वैद्यकीय साहित्यासंबंधीही आढावा

आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळाबरोबरच पंतप्रधानांनी ऑक्सिजन आणि औषधांच्या मुद्यावर अधिकारी-तज्ञांची रविवारी चर्चा केली. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी तज्ञांशी औषध आणि ऑक्सिजनची उपलब्धता यावर चर्चा केली. सद्यस्थितीत उपलब्ध असलेला औषधसाठा आणि विदेशातून प्राप्त होत असल्याल्या मदतीची माहितीही पंतप्रधानांना यावेळी देण्यात आली.

Related Stories

बझारमधुन महिला ग्राहकाचे सापडलेले सोन्याचे घंटण

Abhijeet Shinde

वारणेचा इथेनॉल निर्मितीत राज्यात उच्चांक : वीजनिर्मितीतून ७ कोटी युनिटस निर्यात

Sumit Tambekar

राज्य उत्पादन शुल्क जवानांच्या ताब्यातून आरोपीचे पलायन

Abhijeet Shinde

ममता बॅनर्जी तिसऱयांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान

Patil_p

बीडमध्ये कार आणि टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू

Abhijeet Shinde

नववधूला उचलून घेत ओलांडली नदी

Patil_p
error: Content is protected !!