Tarun Bharat

एम्समध्ये आता चाचण्या होणार मोफत

Advertisements

आरोग्य मंत्रालयाकडून शिफारसींना मंजुरी

@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानने (एम्स) रुग्णांच्या उपचाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. एम्सने आता 500 रुपयांपेक्षा कमी खर्चाच्या सर्व वैद्यकीय चाचण्यांकरता कुठलेच शुल्क न आकारण्याचा निर्णय लागू केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंबंधीच्या शिफारशींना मंजुरी दिली आहे.

या निर्णयानंतर एम्समध्ये आता रक्तचाचणीपासून एक्सरे, सीटी स्कॅन इत्यादी सर्व अन्य चाचण्यांची सुविधा मोफत मिळणार आहे. आतापर्यंत या सर्व चाचण्यांसाठी एम्समधील काऊंटरवर शुल्क भरावे लागत होते.

एम्समध्ये प्रतिदिन सुमारे 50 ते 80 हजार चाचण्या केल्या जातात. परंतु आता या चाचण्या मोफत करण्यात आल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. तर रुग्णांना या चाचण्यांचा अहवाल त्याचदिवशी ऑनलाईन उपलब्ध केला जाणार आहे.

Related Stories

उत्तराखंडात 618 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक एक प्रक्रिया, युद्ध नाही : शशी थरूर

Abhijeet Shinde

राज्यात निम्मे रुग्ण संसर्गमुक्त

Patil_p

पाकिस्तानला दहा दिवसात धूळ चारू

Patil_p

सुनावणी अपूर्ण, आर्यन तुरुंगातच

Patil_p

दोन महिन्यांमध्ये प्रथमच रुग्णसंख्येत घट

Patil_p
error: Content is protected !!