Tarun Bharat

एलआयसीकडून कॅन्सर संस्थेला मोबाईल व्हॅन प्रदान

Advertisements

प्रतिनिधी /पणजी

गोल्डन ज्युबिली फाउन्ड?शन, भारतीय आयुर्विमा महामंडळ, गोवा विभागातर्फे सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून, “संजीवनी- लाईफ बिर्यौन्ड र्कैन्सर” या संस्थेला मोबाईल व्हॅन प्रदान करण्यात आली. ही संस्था विना नफा तत्वावर कर्करोगाच्या रूग्णांचे जीवन समृद्ध करण्यासाठी आणि भारतात र्कैन्सर देखभाल सेवेची गुणवत्ता वृ?ि?गत करण्यासाठी समर्पित आहे.  मोबाईल व्हॅनचा हस्तांतरण समारंभ सी. विकास राव, विभागीय व्यवस्थापक, भारतीय आयुर्विमा महामंडळ, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, यांच्या हस्ते पणजी येथे पार पडला.

कर्करोग हा आजार भारतात वाढत आहे आणि वेळीच उपचार घेण्याकरिता त्या विषयी जागरूकता असणे फार महत्वाचे आहे कारण आजाराच्या सुरवातीस इलाज झाल्यास हा आजार निश्चितच बरा होऊ शकतो. एलआयसीची ’र्कैन्सर कव्हर’ ही एक खास योजना आहे तसेच ’आरोग्य रक्षक’ ही आरोग्य विमा योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे.

जीवन विम्या विषयी जागरूकता आणि ग्राम पंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी ’बिमा ग्राम’  हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. व्याजदर कमी होण्याच्या सध्याच्या परिस्थितीत, भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे अतिशय आकर्षक अशा योजना आहेत ज्या संभाव्य ग्राहकांना अपेक्षित असलेले सर्व लाभ” मिळू शकतात.

सी. विकास राव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पश्चिम क्षेत्राने कुटुंबाला विमा संरक्षण देण्यासाठी आणि सामान्य लोकांमध्ये विमा संरक्षण वाढवण्यासाठी “हमारा परिवार – एलआयसी बिमा परिवार” हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Related Stories

धनगरवाडा अडवलपाल येथील लोकांची रस्त्यासाठी शोकांतिका

Amit Kulkarni

चोविस तासात कोरोनाबाधित दुप्पट

Amit Kulkarni

सत्तरीत लईराई देवीच्या धोंडगणांकडून सोवळे व्रताला सुरुवात

Amit Kulkarni

फोंडा तालुक्याला वादळी वाऱयाचा तडाखा

Amit Kulkarni

रान डुक्करांकडून बार्सेत भातशेतीची नासधूस

GAURESH SATTARKAR

कोरोनाच्या दुसऱया लाटेत लईराई धोंडगण घरातूनच ‘अग्निदिव्य’ पार करणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!