Tarun Bharat

एलआयसीच्या 2 योजनांच्या पेन्शनमध्ये वृद्धी

Advertisements

वृत्तसंस्था/ मुंबई

जगातील सर्वात मोठी सरकारच्या अधिकारात कार्यरत असणारी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी)ने आपल्या दोन लोकप्रिय प्लॅनच्या पेन्शनमध्ये 10 ते 12 टक्क्यांची वाढ केली आहे. या कारणामुळे सदरचा प्लॅन अनेकांना पसंत पडणार आहे.

दुसऱया बाजूला भारतामध्ये खासगी विमा कंपन्या आपल्या सर्व उत्पादनाच्या प्रीमियम रेटमध्ये सलगची वाढ करत आले आहेत. या कंपन्यांनी प्रीमियममध्ये 15 टक्क्यांची वृद्धी करण्याची मागणी केली आहे.

आर्थिक अभ्यासकांच्या माहितीनुसार दोन्ही प्रोडक्ट जीवन अक्षय आणि जीवन शांती या वर्तमान सध्याच्या कालावधीत पेन्शन प्राप्त करण्यासाठी सर्वात चांगल्या पॉलिसी आहेत. या अगोदर न्यू जीवन अक्षयवर 60 वर्षाच्या वयावर 10 लाख जमा करण्यात आल्यानंतर वार्षिक पेन्शन 53,350 रुपये मिळत होती. परंतु सध्या 1 फेब्रुवारी 2022 पासून पॉलिसी घेतल्यानंतर वार्षिक पेन्शन 58,150 रुपये मिळणार आहे.

जीवन अक्षय आणि जीवन शांती प्लॅन

उपलब्ध माहितीनुसार कंपनीचा जीवन अक्षय प्लॅन(857 आणि जीवन शांती(858)च्या अंतर्गत पेन्शनमध्ये एक फेबुवारी 2022 पासून ही वाढ लागू करण्यात आली आहे.

Related Stories

‘ग्रेसिम’ करणार विस्तारासाठी 2 हजार कोटींची गुंतवणूक

Patil_p

सलग चौथे सत्रही तेजीसह बंद

Patil_p

‘आर्सेलर’च्या सीईओपदी आदित्यची वर्णी

Patil_p

भारतीय अर्थव्यवस्था गतीमान होणार

Patil_p

नवीन सात कंपन्या 15 ऑक्टोबरपर्यंत होणार सुरू

Patil_p

प्रवासी वाहन बाजारपेठेत 20 ते 22 टक्के महसूल वाढीचे संकेत

Patil_p
error: Content is protected !!