Tarun Bharat

एलआयसीतर्फे विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप

प्रतिनिधी /बेळगाव

भारतीय जीवन विमा निगममधील प्रतिनिधींच्या वेल्फेअर संघाने बुधवार दि. 16 जून ते 30 जूनपर्यंत आपल्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारला आहे. या विविध मागण्यांमध्ये त्यांनी नव्याने विमा प्रतिनिधी म्हणून सेवा बजावणाऱया आपल्या सहकाऱयांना यापुढे ग्रेच्युटीचा लाभ 5 लाख मिळावा. यासह समूह विमा  50 लाख, वैद्यकीय सेवालाभ संपूर्ण कुटुंबासाठी 25 लाख, कोरोनामुळे मृत पावलेल्या विमा प्रतिनिधींच्या नातेवाईकांना 50 लाख, आणि नवीन विमा करू न शकलेल्या प्रतिनिधींना 1 लाख कोविड ऍडव्हान्स म्हणून देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

 याबरोबरच विमा प्रतिनिधींना वृद्धाप निवृत्ती वेतन, क्लब मेंबरसाठी फूड कुपन, कार्यालयीन भत्ता, मुलांसाठी शैक्षणिक कर्ज, वार्षिक विमा पॉलिसी संख्येत कपात, ग्राहकांच्या पॉलिसीवरील बोनसमध्ये वाढ, अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी पंधरा दिवस संप पुकारला.

  यावेळी बेळगाव शहर शाखा क्र. 2 मधील वरि÷ प्रतिनिधी सतीश गौरगोंडा, भरतेश कालगौडर, विभागीय सेपेटरी, संजय उपाध्ये, अध्यक्ष, बबन कुपुटकर सेपेटरी, पी. डी. एन. देसाई, टी. पी. जनगौडा, संजय डोरकर, अशोक कल्लनावर, विपुल मोटार आदी उपस्थित होते.

Related Stories

न्यायालयीन कामकाजाला पुन्हा सुरुवात

Amit Kulkarni

बटाटा-कांदा उत्पादक शेतकऱयांमध्ये संभ्रम

Patil_p

हळद रुसली, कुंकूही रुसलं अन् सगळंच संपलं!

Amit Kulkarni

कचरावाहू वाहनाच्या बॅटरीची चोरी झाल्याने कचरा उचल ठप्प

Amit Kulkarni

थेट बांधावरच अधिकाऱयांचे शेतकऱयांना मार्गदर्शन

Patil_p

गुरुवारी कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ

Omkar B