Tarun Bharat

‘एलआयसी’ आयपीओला सेबीची मंजुरी

Advertisements

मागील महिन्यात सेबीकडे दिला होता अर्ज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याच्या तयारीत एलआयसी ही विमा कंपनी आहे. त्याकरीता कंपनीला बाजारातील नियामक सेबी यांच्याकडून परवानगी मिळाली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. एलआयसीने मागील महिन्यात याकरीता अर्ज दिला होता. उपलब्ध अहवालानुसार सेबीने याकरीता ऑब्जरव्हेशन लेटर (observation letter) सादर केले होते. सरकारने चालू आर्थिक वर्षात हा आयपीओ आणण्याची तयारी केली आहे.

सरकार एलआयसीमधील पाच टक्के हिस्सेदारी विकू शकते. यातून 60,000 कोटीपेक्षा अधिकची रक्कम प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सेबीच्या मंजुरीनंतर आगामी 12 महिन्यांपर्यंत ही मान्यता ग्राहय़ धरली जाणार असल्याची माहिती आहे.

एलआयसी कंपनीने मागील महिन्यात आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे  कागदपत्रे सादर केली होती. यासोबतच सरकार यातील 31,62,49,885 इक्विटी समभाग विक्री करणार आहे. कंपनीची संपूर्ण हिस्सेदारी सरकारजवळ आहे. या इश्यूमधील एकूण 50 टक्के हिस्सा क्वालिफाइड इन्स्टिटय़ूशनल बायर्ससाठी आरक्षित केला होता. याप्रकारे 15 टक्के हिस्सा हा नॉन इन्स्टिटय़ूशनल बायर्ससाठी राहणार आहे व 35 टक्के हिस्सा हा रिटेल इन्वेस्टर्ससाठी आरक्षित केला जाणार आहे. कर्मचारी आणि पॉलिसीहोल्डर्सजवळील स्वस्त शेअर घेण्याची संधी गुंतवणूकदारांना उपलब्ध होणार आहे.

याच आर्थिक वर्षात येणार का?

माध्यमांमधील काही अहवालानुसार सरकार हा इश्यू आगामी आर्थिक वर्षातही टाळण्याचे संकेत आहेत. कारण सध्या रशिया व युक्रेन यांच्यात सुरु असणाऱया लढाईच्या स्थितीमुळे शेअर बाजारात सुरु असणारी उलाढाल व अस्थिरता कारणीभूत असल्याची माहिती आहे.

Related Stories

हिरो मोटोकॉर्प कंपनीने लुधियानामध्ये उभारला कारखाना

Patil_p

एनटीपीसी-ओएनजीसी यांच्यात करार

Patil_p

सुक्ष्म, लघू-मध्यम उद्योगाला पॅकेज ?

Patil_p

ओमिक्रॉनच्या धास्तीने बाजार प्रभावीत

Patil_p

ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर जानेवारीत येणार

Omkar B

1 जुलैपासून बँकिंग संदर्भातील नियम बदलणार

Patil_p
error: Content is protected !!