Tarun Bharat

एलएलएम परीक्षेत राधा नाईकला सुवर्णपदक

प्रतिनिधी/ मडगाव

भारती विद्यापीठ पुणे तर्फे घेण्यात आलेल्या एलएलएम परीक्षेत गोव्याच्या राधा विवेक नाईक हिला सुवर्णपदक प्राप्त झाले. पुणे येथे झालेल्या दीक्षांत समारंभात तिला हे सुवर्णपदक तसेच एलएलएमची पदवी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

राधा नाईक हे प्रसिद्ध फोटोग्राफर तथा मडगावचे व्यावसायिक विवेक कृष्णनाथ नाईक यांची कन्या असून तिने आपले एलएलबी व नंतर एलएलएमचे शिक्षण पुण्यातील भारती विद्यापीठातून पूर्ण केले. तिच्या या यशाबद्दल फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक, माजी खासदार ऍड, नरेंद्र सावईकर तसेच इतरांनी अभिनंदन केले आहे.

एलएलएम परीक्षेत भारती विद्यापीठात राधा नाईकने सर्वाधिक गुण प्राप्त करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. एलएलबी परीक्षेत देखील तिने उल्लेखनिय कामगिरी बजावली होती.

Related Stories

संजीवनी सोडून अन्य कुठल्याही कारखान्याला ऊस पाठविणार नाही

Omkar B

उसगांवात पहिल्या दिवशी पूर्ण लॉकडाऊन

Omkar B

मोफत विजेचे आश्वासन म्हणजे ऋण काढून सण आमदार नीळकंठ हळर्णकर यांची टीका

Amit Kulkarni

राजकीय वादातून कळंगूट शिवजयंती रॅली रोखली

Amit Kulkarni

ऍड. यतीश नाईक यांचा भाजपात प्रवेश

Amit Kulkarni

विजय – दिगंबरने पिंपळकटय़ावर केली प्रचाराची सांगता

Patil_p