Tarun Bharat

एव्हरेस्ट सर करण्यासाठी कस्तुरी सज्ज

बेसपॅम्प ते शिखर मार्गातील पॅम्प-थ्रीपर्यंत सराव केला 3 वेळा, वेदर विन्डो मिळाल्यानंतर शिखराकडे करणार प्रयाण

संग्राम काटकर / कोल्हापूर

कोल्हापूरी कन्या कस्तुरी दीपक सावेकर ही जगातील सर्वात उंच म्हणजे 29 हजार 29 फुट उंचीचे माऊंट एव्हरेस्ट शिखर गाठण्यासाठी सर्व बाजूंनी सज्ज झाली आहे. तिला आता फक्त एव्हरेस्ट शिखरावर जाऊन तिरंगा फडकवण्यासाठी वेदर विन्डो मिळण्याची प्रतिक्षा आहे. विन्डोची माहिती मिळाल्यानंतर ती बेसपॅम्पमधून सावधगिरीने जीवघेणी बर्फवृष्टी आणि दोन्ही बाजूला हजारो फुट खोल दऱ्या अशा मार्गातील वाट तुडवत शिखराकडे प्रयाण करेल. कस्तुरी 26 हजार फुटापर्यंत पोहोचल्यानंतर तिला शिखरापर्यंत जाताना 8-10 नव्हे तर तब्बल 40 ते 60 डिग्री मायनस टेम्परेचरशी झुंजावे लागणार आहे.

शिवाय शिखर सर केल्यानंतर खाली येताना कस्तुरीला नियमाप्रमाणे पॅम्प-फोरमार्गे पॅम्प-थ्रीपर्यंत यावे लागणार आहे. शिवाय पॅम्प-फोरपासून शिखरापर्यंत आणि शिखरापासून ते परत पॅम्प-थ्रीपर्यंतची महाभयानक कसरत तिला 26 ते 28 तासातच करावी लागणार आहे. सत्तर दिवसांच्या या एव्हरेस्ट शिखर मोहिमेला 20 वर्षीय कस्तुरीने गेल्या 27 मार्चपासून सुरुवात केली आहे. शिखराकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे, त्या मार्गात तिला महाभयानक थंडी, कड्याकपाऱ्यांवरुन कोसळणारे रॉक फॉल्स, स्नो फॉल्स, विरळ ऑक्सिजन असे जीवावर बेतणारे टप्पे झेलावे लागत आहेत. या टप्प्यांच्या ठिकाणच्या वातावरणाशी आपली शरीरयष्टी मिळती-जुळती व्हावी यासाठी तीने एव्हरेस्ट शिखर मार्गावरील 17 हजार फुट उंचीवर असलेला बेसपॅम्प ते पॅम्प-वन, बेसपॅम्प ते पॅम्प-टू आणि बेसपॅम्प ते पॅम्प-थ्री असे 3 वेळा ऍक्लमाटाईज वॉक केला आहे. हा वॉक पुर्ण होणे म्हणजे संबंधित गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करण्यासाठी सज्ज होणे. त्यानुसार वॉकचा सराव करुन कस्तुरी बेसपॅम्प येथून एव्हरेस्ट शिखरावर जाण्यासाठी सज्ज झाली आहे. आता तिला फक्त शिखरावर पाय ठेवण्यासाठी वेदर विन्डो मिळण्याची प्रतिक्षा आहे.

काय आहे वेदर विंन्डो…

एव्हरेस्ट शिखर मार्गातील 26 हजार फुट उंचीवरील पॅम्प-फोर येथून शिखरापर्यंतच्या भागात तासी 150 ते 200 किलो मीटर इकत्या वेगाने वारे वाहत असते. वाऱ्याचा वेग जेंव्हा तासी 50 किलो मीटर इतका होतो, तेंव्हा शिखराकडे जाण्यासाठी वेदर विंन्डो मिळाली असे संकेत मिळतात. या संकेतानुसार शिखर मार्गातील 26 हजार फुट उंचीवरील पॅम्प-फोर येथे जावे लागते. येथे गेल्यानंतर वारे तासी 50 किलो मीटर वेगानेच आहे, वातावरणही स्वच्छ आहे, याची खात्री करुन शिखराकडे पावले टाकावी लागतात.  

एव्हरेस्ट शिखराकडे जाण्यासाठी कस्तुरीचे असे आहे नियोजन…

नेपाळी शेर्पा (मार्गदाता) कस्तुरीसोबत आहे.

शेर्पाने आजवर 5 वेळा एव्हरेस्ट शिखर सर केले आहे.

बर्फ भागात सुरक्षित राहण्यासाठी कस्तुरीने परिधान केलेत कपड्यांचे पाच थर.

ऑक्सिजन सिलिंडरसह अन्य 15 किलोचे साहित्य घेऊ शिखर चढाई करणार.

एव्हरेस्ट शिखरापर्यंत प्रवास जीव घेणाच…

26 हजार फुट उंचीवरील पॅम्प-फोर येथून एव्हरेस्ट शिखरापर्यंतच्या मार्गात अतिशय विरळ म्हणजे केवळ 3 ते 4 टक्के ऑक्सिजन असतो. तसेच मधल्या टप्प्यात एकावेळी एकच गिर्यारोहक पुढे जाऊ शकेल, इतकी अरुंद हिलरी स्टेप (छोटी एक पायवाट) आहे. या स्टेपमधून जाताना गिर्यारोहकाचा तोल जाऊन तो हजारो फुट खोल दरीत पडण्याची मोठी शक्यता असते.

Related Stories

प्रॅक्टीस ‘अ’, उत्तरेश्वरची प्रतिस्पर्धी संघांवर मात  

Archana Banage

सांगलीच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 9 जणांवर गुन्हा

Archana Banage

विकास आघडीच्या अभ्यासमंडळाची यादी अंतिम

Archana Banage

गावागावांत राजकीय हालचालींना वेग,गटप्रमुखांकडून उमेदवारांची चाचपणी

Archana Banage

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक पलटी, चालक जखमी

Archana Banage
error: Content is protected !!