Tarun Bharat

एसआयटीकडून प्रकाश सिंग बादलांना समन्स

कोटकपूरा गोळीबारप्रकरणी करणार चौकशी  

वृत्तसंस्था  / चंदीगड

कोटकपूरा गोळीबाराची चौकशी करणाऱया विशेष तपास पथकाने (एसआयटी) पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांना पाचारण केले आहे. 16 जून रोजी त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे समजते. प्रकाश सिंग यांना मोहाली येथील पीएसपीसीएल गेस्टहाउसमध्ये हजर रहावे लागणार आहे. पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीपूर्वी हा महत्त्वाचा घटनाक्रम असल्याचे मानले जात आहे.

एप्रिल महिन्यात पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने कोटकपूरा गोळीबाराप्रकरणी सादर करण्यात आलेला एसआयटीचा चौकशी अहवाल रद्दबातल ठरविला होता. तसेच नवी एसआयटी स्थापन करण्याचा निर्देश दिला होता. ज्यानंतर याप्रकरणाच्या तपासासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक एल.के. यादव यांच्या नेतृत्वखाली नवी एसआयटी स्थापन करण्यात आली होती.

एसआयटीने माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना समन्स बजावून 16 जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये कोटकपूरा येथे गोळीबाराची घटना घडली होती. तेव्हा प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री होते. गोळय़ा कुणाच्या आदेशावरून झाडण्यात आल्या याचा तपास एसआयटी करत आहे. पोलिसांनी स्वयंरक्षणार्थ गोळय़ा झाडल्या होत्या का राजकीय दबावाखाली गोळीबार केला होता हे पाहिले जाणार आहे. यापूर्वी देखील प्रकाश सिंग बादल आणि त्यांचे पुत्र सुखबीर सिंग बादल यांची जुन्या एसआयटीने चौकशी केली आहे.

ऑक्टोबर 2015 मध्ये फरीदकोट येथे गुरु ग्रंथ साहिबची पाने विखुरलेली आढळून आल्यावर कोटकपूरा येथे शिखांनी निदर्शने केली होती. 14 ऑक्टोबर 2015 रोजी कोटकपूरामध्ये पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात दोन जणांना जीव गमवावा लागला होता तर अनेक जण जखमी झाले होते.

Related Stories

‘एनडीए’साठी विद्यार्थिनींची पहिली तुकडी सज्ज

Patil_p

अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे निधन

Patil_p

तामिळनाडू स्फोटाप्रकरणी 5 जणांना अटक

Patil_p

सिलिंडर स्फोटाने राजस्थान हादरले

Patil_p

उत्तराखंड : कोरोना रुग्णांनी ओलांडला 55 हजारांचा टप्पा

Tousif Mujawar

मतुआबहुल भागातील निकाल ‘सीएए’साठी महत्त्वपूर्ण

Patil_p