Tarun Bharat

एसएफसी अनुदान मंजुरीसाठी कॅन्टोन्मेंटकडून पाठपुरावा

2012 पासून रोखलेले एसएफसी अनुदान मंजूरची राज्य शासनाकडे पत्राद्वारे मागणी : कॅन्टोन्मेंट हद्दीतील पथदीप अद्याप बंदच

प्रतिनिधी /बेळगाव

कॅन्टोन्मेंट बोर्डकडे निधी नसल्याने हेस्कॉमचे बिल व पाणी बिल थकले आहे. परिणामी हेस्कॉमने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या पथदिपांचा विद्युत पुरवठा तोडला आहे. त्यामुळे ही बाब कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने नगरविकास खात्याच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच 2012 पासून रोखण्यात आलेले एसएफसी अनुदान मंजूर करण्याची मागणी पत्राद्वारे राज्य शासनाकडे केली आहे.

राज्य शासनाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डला एसएफसी अनुदानांतर्गत निधी मिळत होता. त्यामधून विद्युत बिलाची रक्कम अदा करण्यात येत होती. पण 2012 पासून राज्य शासनाने हा निधी रोखला आहे. तेव्हापासून विद्युत बिलाची रक्कम थकली आहे. त्यामुळे हेस्कॉमने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या पथदिपांचा विद्युत पुरवठा बंद केला आहे. परिणामी कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्ते अंधाराच्या विळख्यात सापडले आहेत. विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी हेस्कॉमला विनंती करण्यात आली. पण विद्युत बिलाची रक्कम जमा करण्याची सूचना केली. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद केल्याची माहिती नगरविकास खात्याच्या निदर्शनास आणून देऊन एसएफसी अनुदान मंजूर करण्याची विनंती करण्यात आली.

यापूर्वी रोखण्यात आलेले एसएफसी अनुदान मंजूर करण्याची मागणी राज्य शासनाला पत्र पाठवून केली होती. त्यामुळे राज्य शासनाकडून सत्कारात्मक प्रतिसाद मिळाला असून एसएफसी अनुदानाबाबत सविस्तर माहिती देण्याची सूचना राज्य शासनाने केली आहे. त्यामुळे सदर निधी मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाठविण्यात आली आहेत.

कॅन्टोन्मेंट बोर्डची व्याप्ती मोठी आहे, पण लोकसंख्या 20 हजारच्या आत आहे. विशेषतः लष्करी प्रशिक्षणासाठी प्राधान्य दिले जाते. त्यामुळे कॅन्टोन्मेंटला म्हणावे तितके उत्पन्न मिळत नाही. मागील चार वर्षांपासून केंद्र शासनाकडून अनुदान मंजूर झाले नाही. राज्य शासनाकडून एसएफसी अनुदान देण्यात येत होते. मात्र, 2012 पासून एसएफसी अनुदान रोखण्यात आले आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पार्किंग शुल्क, गाळे भाडे, भाजी, मटण, बीफ मार्केट आणि किल्ला भाजी मार्केटमधील गाळय़ांच्या माध्यमातून भाडय़ाच्या स्वरुपात कॅन्टोन्मेंट बोर्डला महसूल मिळत होता. पण किल्ला भाजी मार्केट स्थलांतर करण्यात आले असून न्यायालयात वाद सुरू आहे. कोरोनामुळे दीड वर्षापासून पार्किंग शुल्कला मुकावे लागले. तसेच काही गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले नसल्याने महसूल बुडाला आहे. घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करून महसूल वाढविण्याचा प्रयत्न कॅन्टोन्मेंट बोर्डने केला होता. पण नागरिकांच्या विरोधामुळे जेमतेम वाढ करण्यात आली. परिणामी कॅन्टोन्मेंट बोर्डची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे हेस्कामच्या विद्युत बिलाची रक्कम आणि पाणीपुरवठा मंडळाचे पाणी बिल थकले आहे.

एसएफसी अनुदान मंजूर केल्यास विद्युत बिलाची रक्कम अदा करणे शक्य

सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डकडे निधी उपलब्ध नाही. केंद्र शासनाकडूनही निधी मंजूर करण्यात आला नाही. रोखण्यात आलेले एसएफसी अनुदान पुन्हा मंजूर करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात आला आहे. राज्य शासनाने एसएफसी अनुदान मंजूर केल्यास विद्युत बिलाची रक्कम अदा करणे शक्मय असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीबर्चस्वा यांनी दिली.

Related Stories

तरुण भारत सौहार्द सोसायटीचे आकर्षक व्याजदर

Amit Kulkarni

दसरा कराटे स्पर्धेत बेळगाव जिल्हा कराटे संघटनेला यश

Amit Kulkarni

मनपा निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Amit Kulkarni

सिग्नेचर क्लब, सीसीआय ब संघ विजयी

Amit Kulkarni

बेळगावच्या स्केटींगपटूंचे यश

Amit Kulkarni

‘दो आँखें बारह हाथ’ उतरतेय प्रत्यक्षात!

Amit Kulkarni