Tarun Bharat

एसटीच्या उत्पन्नात दोन लाखांनी वाढ

Advertisements

प्रतिनिधी / रत्नागिरी :

जिह्यात एसटी बसमधून शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद दिसून आला असून रत्नागिरी विभागाला 2 लाख 18 हजार रूपये अधिकचे उत्पन्न मिळाले आहे.  दरम्यान रविवारपासून शिवशाही बससेवाही सुरू होत असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱयांनी दिली.

कारोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे 5 महिन्यांहून अधिक काळ प्रवासी वाहतूक बंद होत़ी मात्र कोकणातील गणपती उत्सव लक्षात घेवून चाकरमान्यांसाठी एसटी बस सुरू करण्यात आल्य़ा मात्र त्यासाठी विविध अटी शर्थी शासनाकडून लादण्यात आल्या होत्य़ा शुक्रवारपासून एका सीटवर एक प्रवासी या नियमापासून शिथिलता देत पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास एसटीला शासनाकडून मंजूरी देण्यात आल़ी

जिह्यामध्ये सध्या एसटीच्या एकूण 2 हजार फेऱया चालवल्या जात आहेत़ 18 सप्टेंबर रोजी पूर्ण क्षमतेने एसटी सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरी विभागाला 17 लाख 93 हजार रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाल़े 17 सप्टेंबर रोजी हेच उत्पन्न 15 लाख 65 हजार होत़े त्यामुळे पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याचा एसटी विभागाला फायदा झाल्याचे दिसून येत आह़े जवळपास 2 लाख 18 हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आह़े  नजीकच्या काळात प्रवाशांचा आणखी प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असून त्यानंतर फेऱयांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे.

    कारोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची चाके थांबल्याने रत्नागिरी विभागाला मोठा फटका बसला होत़ा मात्र आता राज्य व केंद्र शासनाच्यावतीने मिशन बिगीन अगेन सुरू झाले असून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील केले जात आहेत. त्यानुसार एसटीची प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी विशेष भर देण्यात येत आह़े रत्नागिरी शहर परिसरातील नागरिकांसाठी शहर बससेवाही सोमवारपासून सुरू होत आहे. तर आरामदायी प्रवासासाठी प्रसिद्ध असलेली शिवशाही बस सेवाही रविवारपासून सुरू होत आह़े

युपीएससीच्या परीक्षार्थींसाठी विशेष एसटी बसची व्यवस्था

  केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी मुंबई येथे जाणाऱया विद्यार्थ्यांसाठी 2 व 3 ऑक्टोबर रोजी जिह्यातून एसटी बस सोडण्यात येणार आहेत़ तर परतीसाठी 4 व 5 ऑक्टोबर रोजी विशेष बस सोडण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाकडून देण्यात आली. दरम्यान परीक्षेसाठी जाणाऱया विद्यार्थ्यांनी बसच्या माहितीसाठी नजीकच्या एसटी बस आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आह़े

Related Stories

मुंबईतून चालत येणाऱया 34 जणांना पोलिसांनी अडवले!

Patil_p

युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षक दिन साजरा

NIKHIL_N

डाॅक्टर दिनानिमित्त लोकमान्य मल्टिपर्पजतर्फे वेंगुर्ल्यातील डाॅक्टरांचा सत्कार

Anuja Kudatarkar

दापोलीत रानगव्याचे दर्शन

Archana Banage

लोटेतील ‘वनविड, योजना’ची उत्पादन बंदी उठवली!

Patil_p

गुहागर तालुक्यात सडे जांभारी येथील गरोदर महिलेला कोरोना

Archana Banage
error: Content is protected !!