Tarun Bharat

एसटीच्या सातारा विभागाची दुसरी टीम ठाण्याला रवाना

सातारा प्रतिनिधी

कोरोना का रोना नही.. रोना हैं कोरोना को हराना है च्या गजरात महामंडळाची सातारा विभागातील दोन पथके पालघर, पनवेल आणि ठाणे या ठिकाणी सेवा बजावण्यासाठी रवाना झाल्या. दुसऱया 22 जणांच्या टीममध्ये सातारा, वडूज, दहिवडी, मेढा, वाई, पारंगाव खंडाळा आगारातील चालक वाहक सहभागी झाले आहेत.

कोरोना विषाणूमुळे सगळीकडे लॉकडाऊन आहे. या काळात अत्यावश्यक म्हणून सेवा देण्याकरता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशानुसार विभाग नियंत्रक सागर पळसुले, विभागीय वाहतूक अधिकारी मोरे, यंत्र अभियंता मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सर्व आगार प्रमुख, स्थानक प्रमुख, वाहतूक निरिक्षक, वाहतूक नियंत्रक व सहकारी कर्मचाऱयांनी चालक वाहकांचे मनोधैर्य वाढवून त्याना प्रेरीत केले. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात सातारा विभागाच्या दोन्ही टीम रवाना झाल्या.

Related Stories

रोमांचक टायनंतर सुपरओव्हरमध्ये दिल्लीची बाजी

Patil_p

साखळी उपनगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल

Omkar B

नेत्रदीप सरनोबत यांच्याकडून काढून घेतला शहर अभियंतापदाचा कार्यभार

Abhijeet Khandekar

महाविद्यालयांना मिळणार प्रोत्साहनपर निधी

Abhijeet Khandekar

देहरादून जेलमधील आणखी 26 कैदी कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

सांगली : पलूस येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे – आ.अरुण लाड

Archana Banage
error: Content is protected !!