Tarun Bharat

एसटी कर्मचारी संप : शरद पवार- अनिल परब यांच्यात बैठक

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावे, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे 20 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्यावर तोडगा निघत नसल्याने या मुद्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात वरळीतील एका हॉटेलमध्ये गोपनीय बैठक सुरू असल्याचे सांगण्यात येते.

एसटी कर्मचारी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे या मागणीवर चर्चा करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारनं समिती नेमली आहे. समितीच्या अहवालानुसार निर्णय घेऊ, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. मात्र, तरीही एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन मागे घेतले जात नसल्याने पेच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अनिल परब यांच्यात बैठक सुरू असल्याचे समजते.

Related Stories

दिल्लीत दिवसभरात 4 हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण; 86 मृत्यू

Rohan_P

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 66 रूग्ण : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहीती

Rohan_P

‘सबका साथ’साठी तालिबान तयार, पण…”

Abhijeet Shinde

सातारा : 54 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 555 नमुने पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

मुलानेच केला वृद्ध आईचा खून

Ganeshprasad Gogate

शाब्बास ! कुरुंदवाडच्या चहा विक्रेत्याची मुलगी बनली आंतरराष्ट्रीय वेटलेफ्टर विजेती

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!