Tarun Bharat

एसटी कर्मचाऱयांचे विभागाकडून मानसिक खच्चीकरण

-संपकरी कर्मचाऱयांचा आरोप

प्रतिनिधी/ रत्नागिरी

एसटीच्या विलिनीकरणासंदर्भात एसटी कर्मचारी मागील 2 महिन्यांपासून संपावर आहेत़ या कर्मचाऱयांवर वारंवार निलंबन, बडतर्फी आदी कारवाई विभागाकडून करण्यात येत आह़े यामुळे कर्मचाऱयांचे मानसिक खच्चीकरण करण्यात येत असल्याचा आरोप संपकरी एसटी कर्मचाऱयांनी केला आह़े या संदर्भात कर्मचाऱयांनी  शुक्रवारी विभागीय वाहतूक नियंत्रकांना निवेदन सादर केल़े

या संदर्भात संपावर असलेले एसटी कर्मचारी भाई केळकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना कर्मचाऱयांवर प्राधिकारी एकतर्फी कारवाई करत असल्याचे सांगितल़े  संपावर असलेले कर्मचारी शक्य हाईल, त्याप्रमाणे सक्षम अधिकाऱयांपुढे आपली बाजू मांडत आहेत़ असे असतानाही कर्मचाऱयांचा कोणताही विचार न करता मनमानी पद्धतीने विभागाकडून कारवाई करण्यात येत आह़े यातून कर्मचाऱयांचे मानसिक खच्चीकरण होत आह़े तसेच छळवणूकही होत असल्याचा आरोप केळकर यांनी केला आह़े

   730 कर्मचारी कामावर रूजू

शुक्रवारी रत्नागिरी विभागातील 730 कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत़ तर  रत्नागिरी विभागातून एसटीच्या एकूण 400 फेऱया सोडण्यात आल्य़ा यात तब्बल 20 हजाराहून अधिक प्रवाशांनी एसटीच्या सेवेचा लाभ घेतल़ा रत्नागिरी विभागात एसटीचे प्रशासन, कार्यशाळा, यांत्रिकी, चालक वाहक असे मिळून 3 हजार 679 कर्मचारी आहेत़ एसटीच्या विलीनीकरणाच्या मुद्यावर हे सर्व कर्मचारी संपावर गेले होत़े मात्र आता महिन्यानंतर एसटीचे कर्मचारी कामावर परतू लागले आहेत़

  शुक्रवारी सोडल्या 400 गाडय़ा

हजर झालेल्या कर्मचाऱयांमध्ये प्रशासकीय 257, कार्यशाळा 202, चालक 74, वाहक 72, चालक तथा वाहक 37 अशा 642 कर्मचाऱयांचा समावेश आह़े  एसटी कर्मचारी कामावर हजर होत असल्याने रत्नागिरी विभागातून गाडय़ा सोडण्यासही सुरूवात झाली आह़े  शुक्रवारी जिह्याच्या विविध आगारातून 400 फेऱया सोडण्यात आल्य़ा या फेऱयांनाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आह़े  शुक्रवारी 20 हजार प्रवाशांनी एसटी फेऱयांचा लाभ घेतल़ा

Related Stories

‘दिन दिन दिवाळी’ गाण्याची निर्मिती

NIKHIL_N

रत्नागिरी : कोकण मार्गावर २१ पासून कोचुवेली – श्री गंगानगर धावणार

Archana Banage

अनधिकृत साहसी ‘जलपर्यटन’ बंदर विभागाकडून बंद

Anuja Kudatarkar

निसर्ग वादळाचा संगमेश्वरलाही तडाखा

Patil_p

ट्रकची एसटीला धडक , 11 जखमी

Patil_p

शिक्षक ऑनलाईन बदल्यांच्या वैधतेला आक्षेप

NIKHIL_N