Tarun Bharat

एसटी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘धडक’

खाजगीकरण नको, विलिनीकरण करावे ही मुख्य मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी

गेल्या तीन महीन्यापासून एसटी कर्मचाऱयांचा संप सुरू आहे. एसटीचे विलिनीकरण करून, या संपामध्ये मार्ग काढावा या मागणीसाठी सोमवारी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून काढलेल्या या मोर्चामध्ये एसटीच्या कोल्हापूर बारा आगारामधील कर्मचारी व कुटुंबिय सहभागी झाले होते. जनतेच्या हिताची एसटी सेवा मोडून काढून खाजगीकरण करण्याचा डाव राज्य सरकारकडून सुरू आहे. याबाबत एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासाठी धोरण जाहीर करावे या प्रमुख मागणीसाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला. स्टेशन रोडवरून असेंब्ली रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोंर्चा आला. जनतेची एसटी वाचली पाहीजे यासह विविध मागण्यासह घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दूमदूमून गेला.

एसटीची सेवा ही सुरक्षित असून, विद्यार्थी, वृध्द, तसेच अनेकांना सवलत दिली जात आहे. एसटीपासून राज्य सरकारला विविध कराव्दारे मोठे उत्पन्न मिळत आहे. असे असताना एसटी तोटयात असल्याचे चित्र सरकारकडून रंगवले जात आहे. जनतेची एसटी मोडीत काढण्याचे धोरण राज्य सरकारकडून सुरू आहे. कर्मचाऱ्यांना पेन्शसह इतर सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. याला आमचा विरोध असल्याने एसटी कर्मचारी आता रस्त्यावर उतरले आहेत. कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरण भूमिकेला कृती समितीने पाठींबा दिला आहे.

एस टी दीर्घकाल बंद असल्यामुळे एसटी मोडीत जाऊन, खाजगीकरणाची भिती व्यक्त होत आहे. प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार संपकरी कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा काढत आहे हे धोरण अत्यंत चुकीचे व असंतोष वाढवणारे असल्याने जनतेचे हाल होत आहे.

Advertisements

Related Stories

राजस्थानमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या 18,785 वर

Rohan_P

जगप्रसिद्ध मल्ल सादिक पंजाबी यांचे पाकिस्तानात निधन

Abhijeet Shinde

मान्सून 15 मे पर्यंत अंदमानात

datta jadhav

कोल्हापूर : श्री महालक्ष्मी तलावाचा बंधारा बनतोय कमकुवत; तज्ञांच्या सल्ल्याने मजबुतीकरणाची गरज

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मनपाडळ्यात जनावरांच्या गोठ्याला आग, सूमारे पाच लाखाचे नुकसान

Abhijeet Shinde

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावरील नो एंट्री’चा ताण सीपीआर’ वर..!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!