Tarun Bharat

एसटी कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे वेतन एका तासात देणार : अनिल परब

ऑनलाईन टीम / मुंबई : 


एसटी कर्मचाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन एका तासात दिले जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

  • दिवाळीपूर्वी मिळणार दोन महिन्याचे वेतन


ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे वेतन काही तासात म्हणजेच आजच जमा केले जाईल. तर राहिलेल्या दोन महिन्यांचे वेतन दिवाळीपूर्वी दिले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनसही दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत आमची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. बँकेकडे कर्ज मागितले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. तसेच दुःखी होऊन कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना केले आहे. 


दरम्यान, मागील तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांनी आज राज्यभरात आक्रोश आंदोलन केले आहे. 

Related Stories

राहुल गांधी यांचं ‘ते’ ट्विट ट्विटरने हटवले

Archana Banage

गलवान संघर्षात चीनची लपवाछपवी उघड

Patil_p

Kolhapur : दोन्ही राज्यामध्ये प्रशासकीय समन्वय साधण्याचे राज्यपालांच्या बैठकीत निर्देश

Abhijeet Khandekar

“महाराष्ट्रात अक्षय कुमार आणि अमिताभ यांचे सिनेमे, चित्रीकरण बंद पाडू” ; नाना पटोले

Archana Banage

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हांना ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा; केंद्रचा निर्णय

Archana Banage

न केलेल्या गुन्ह्यासाठी मला तुरूंगात टाकण्यात आले…पण मला न्याय मिळाला

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!