Tarun Bharat

एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे मालवणातही परिवहनची वाहतूक ठप्प

Advertisements

शासनात विलनीकरण मागणीसाठी कर्मचारी ठाम : आगारातून सुटणाऱ्या सर्व गाड्या बंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सर्वत्र कामबंद आंदोलन सुरू असल्याची कर्मचाऱ्यांची माहिती

प्रतिनिधी / मालवण

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी गेले काही दिवस सुरू असलेले एसटी कर्मचारी यांचे आंदोलन सोमवारी अधिक तीव्र बनले. आगारातून सुटणाऱ्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या असून चालक, वाहक यासह सर्व एसटी कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.मालवण आगारातून सुटणाऱ्या सर्व गाड्या मध्यरात्री पासून बंद आहेत.

ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे कर्मचारी यांनी सांगितले.सर्व मार्गावर एसटी सेवा बंद असल्याने प्रवासी वर्गाला फटका बसत आहे. मात्र काही प्रवासी वर्गातून एसटी कर्मचारी यांची मागणी योग्य असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका मांडली आहे.

Related Stories

गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणाऱ्या दोघांना वाचविण्यात यश

Abhijeet Shinde

वेताळ प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबीरात ३६ रक्तदात्यांचे रक्तदान

Ganeshprasad Gogate

जिल्ह्यातील २० टक्के ग्रामपंचायती बिनविरोध

Abhijeet Shinde

रत्नागिरी (दापोली) : वादळी वार्‍यांमुळे हर्णैतील नौका पुन्हा किनार्‍याला

Abhijeet Shinde

जिल्हा बँकेच्या नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचे राणेंकडून अभिनंदन

Ganeshprasad Gogate

फिशमीलचा ‘बंपर’ पुन्हा समुद्राच्या तळाशी!

Patil_p
error: Content is protected !!