Tarun Bharat

एसटी कामगारांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी/ रत्नागिरी

गेले 35 दिवस काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या एसटी कामगारांनी  सोमवारी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदन सादर केले. राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील कर्मचाऱयांच्या बदल्या, बडतर्फी, निलंबन मागे घेण्यासंदर्भात या निवेदनात मागणी केली आहे. दरम्यान संपावर असलेल्यांमधील जिल्हय़ातील 573 कर्मचारी सोमवारी कामावर हजर राहिल़े तर 89 कर्मचारी हे अधिकृत सुट्टीवर गेले असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आह़े

 सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केल्यानंतर एसटी कर्मचाऱयांनी पत्रकारांची बोलताना सांगितले की, रत्नागिरी आगारातील सहकारी कर्मचाऱयांनी आत्महत्या केल्या. चालकांवर कामाचा अतिरिक्त ताण असो वा कामगारांना मोटार वाहतूक कामगार अधिनियम 1961 चे तरतुदीचा भंग प्रशासनाने डय़ुटी करायला लावल्यानंतर घडलेल्या प्रवासी वा त्रयस्थ जनतेच्या मरणांतक अपघाताबाबत भीतीच्या वातावरणात जगत आहोत. त्या मानसिक दबाव व दुखवटय़ात असतानाही कोणतीही चौकशी न करता आणि त्यावर उपाय न करता विभाग नियंत्रकांनी बेकायदेशीर बदल्या केल्या आहेत. तसेच अनेक कर्मचाऱयांच्या निलंबन व सेवासमाप्तीचे आदेश काढले आहेत.

अनुचित कामाच्या दबावामुळे चालकांच्या हातून अपघात होऊ नयेत, यासाठी योग्य त्या शासकीय अधिकारी म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे कर्मचाऱयांनी तक्रारी केल्या आहेत. त्यावर कायद्यानुसार कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी भीतीच्या वातावरणात आहेत. या स्थितीत विचारपूस न करता विभाग नियंत्रकांनी बदली, निलंबन, बडतर्फी आदेश काढले आहेत. अशा स्थितीत कोणीही कर्मचारी वा त्यांचे आप्त, नातेवाइक यांनी बरेवाईट करून घेतल्यास त्यास विभाग नियंत्रकांना जबाबदार धरण्यात यावे, असेही निवेदनात नमूद केले आहे.

राजापूरात सोमवारी एकही नवीन कर्मचारी रूजू नाही

राजापूर आगारात आत्तापर्यंत 69 एसटी कर्मचारी हजर झाले आहेत 176 कर्मचारी अद्यापही संपात सहभागी आहेत. सोमवारी एकही नवीन कर्मचारी कामावर हजर झालेला नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या अंतिम इशाऱयाचा कोणताही परीणाम संपकऱयांवर झालेला नाही.

सोमवारपर्यंत कामावर रुजू न झाल्यास मेस्मा लावण्याचा परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अल्टीमेटमची राजापूर आगारातील संपकरी कर्मचाऱयांनी दखल घेतलेली नाही. यामुळे सोमवारी राजापूर आगारात एकही कर्मचारी नव्याने रूजू झालेला नाही. राजापूर आगारात प्रशासनातील 17, तांत्रिक कार्यशाळेतील 25, चालक व वाहक प्रत्येकी आठ, चालक कम वाहक 9 असे कर्मचारी हजर झाले आहेत. राजापूर आगारातुन दररोज 32 फेऱया सुरू असल्याची माहिती आगार प्रमुख राजेश पाथरे यांनी दिली आहे. 

Related Stories

मोठी बातमी ! महाराष्ट्र निर्बंधमुक्त, मास्क पण ऐच्छिक ; राजेश टोपे यांची माहिती

Archana Banage

कर्नाटक : भाजप समर्थित मौलाना शफी सादी यांची वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड

Abhijeet Khandekar

भारतीयांचे आयुर्मान 9 वर्षांनी होणार कमी

Patil_p

भारतीयांची उंची होतेय कमी

Rohit Salunke

सातारा : कोविड काळातील शिक्षणाचे चित्र आशादायक : डाॅ. कोरडे ; शिक्षण विभागातर्फे परिसंवादाचे आयोजन

Archana Banage

सांगली : सहकार पॅनेलच्या उमेदवारांचे निकाला आदीच विजयी बॅनर

Archana Banage