Tarun Bharat

एसटी कामगार संघटनेने केले आक्रोश आंदोलन


सातारा / प्रतिनिधी

सगळेच तुपाशी मात्र एसटी कामगार उपाशी, आक्रोश आंदोलन करतंय कोण, एसटी कर्मचाऱ्यांशिवाय हाय कोण,आक्रोश आंदोलन कशासाठी?, आमच्या हक्काच्या वेतनासाठी, दसरा गेला दिवाळी आली, तीन महिने पगार नाही, अशा घोषणा देत एसटी कर्मचारी मान्यता प्राप्त संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांनी एसटी कॉलनीत आंदोलन केले.

राज्यभर एसटी कर्मचारी मान्यताप्राप्त संघटनेचे आज आक्रोश आंदोलन करण्यात आले.सातारा येथे एसटी कॉलनीत हे आंदोलन करण्यात आले.कर्मचाऱ्यांचे कुटूंबिय सहभागी झाले होते.जोरदार घोषणाबाजी देण्यात आली.या आंदोलनात कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना आपल्या व्यथा मांडल्या.आम्ही कोरोना काळात कसे दिवस काढले आहेत आमचे आम्हाला माहिती आहेत.तीन महिने ज्यांच्या जीवावर घर चालते त्यांना पगार नाही.चटणी नाही तर मीठ नाही, औषधाला खर्च नाही, अशी अवस्था आमची सरकारने केली आहे.दिवाळीला सरसकट 15 हजार द्यावे त्यामुळे काहीतरी आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related Stories

सातारा जिल्ह्यात 583 नागरिकांना दिला डिस्चार्ज

Archana Banage

घरोघरी गौराईचे सोनपावलांनी उत्साहात आगमन

Patil_p

सातारा : जिल्ह्यात ९१ जण कोरोनाबाधित ; एका बाधिताचा मृत्यू

Archana Banage

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

datta jadhav

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

Archana Banage

शिरोळ शहरात एकाच वेळी दोघांचा कोरोनाने मृत्यू

Archana Banage