Tarun Bharat

एसटी थांबली, प्रवाशी खोळंबले

प्रतिनिधी / कोल्हापूर

एसटी कर्मचाऱयांच्या त्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणामुळे गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सर्व एसटी बस मध्यवर्ती बसस्थानकामध्ये थांबून राहिल्या. एसटी थांबल्याने परगावी जाण्यासाठी बसस्थानकात आलेले प्रवाशी खोळंबले. तर दिवसभरातील एसटीच्या सुमारे 3 हजार फेऱया रद्द झाल्या. यामुळे कोल्हापूर विभागाचे सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले. एसटी वाहतूक पुन्हा सुरु होईल या आपेक्षेने प्रवासी तास्नतास बसस्थानकात बसून होते. तर काही प्रवाशांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घेत आपला मार्ग धरला.

खासगी ट्रव्हल्सला मागणी, तिकट दर महागला 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यापुर्वीच खासगी ट्रव्हलचालकांनी दर वाढ केली आहे.मुंबई,औरंगाबाद,नागपूर, सातारा, कोल्हापूर या मार्गावर दरवाढ केल्याचे दिसून येते.ही दरवाढ 250 ते 700 च्या आसपास आहे. एसटी कर्मचाऱयांनी संघटनेच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एसटी सेवा बंद केल्याने खासगी ट्रव्हलचालकांनी मनमानी भाडे आकारण्यास सुरुवात केले आहे.

आंदोलनात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

एसटी कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. एसटी कर्मचारी सेनेच्या सर्वच संघटनांनी यात सहभाग घेतला आहे. मध्यवर्ती बसस्थानकातील विभागीय एसटी कार्यालयासमोर उपोषणासाठी कर्मचारी बसले आहेत. यामध्ये एसटीच्या महिला कर्मचाऱयांची संख्या लक्षणीय आहे.

घोषणांनी परिसर दणाणला

कामगार एकजुटीचा विजय असो, एसटीचे शासनात विलिनीकरण झालेच पाहिजे, आता आर या पारची लढाईच, अशा घोषणांनी एसटीच्या विभागीय कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.

प्रवाशांची फोनाफोनी

उपोषणाला एसटी च्या सर्व संघटनांनी पाठिंबा दिल्याने सर्वच कर्मचारी उपोषणाची ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आले होते. यामुळे एसटी सेवेवर परिणाम झाला होता.चालक-वाहक,कर्मचारी,पदाधिकाऱयांनी उपोषण स्थळी गर्दी केली होती.यामुळे एसटी सेवा ठप्प झाली. याचा फटका प्रवाशांना बसला.यामुळे प्रवाशांची तारंबळ उडाली होती. गावाकडे कळवण्यासाठी प्रवाशांनी फोन करुन याची माहिती दिली.

एसटी कर्मचाऱ्यांचा रोष

उपोषण स्थळी कर्मचाऱयांचे उपोषण सुरु होते. यावेळी लांब पल्ल्यांच्या अनेक एसटी गाडÎा मध्यवर्ती बसस्थानकात येत होत्या. यावेळी उपोषण स्थळी असणाऱया काही कर्मचाऱयांचा या एसटीच्या चालक-वाहकांना रोष पत्कारावा लागला.
पाच टक्के दरवाढ नको

शासनाने नुकतेच एसटी कर्मचाऱयांच्या महागाई भत्यात 5 टक्के वाढ केली आहे. मात्र यावेळी संघटनेच्या विविध नेत्यांनी या महागाई दरवाढीबद्दल नाराजी व्यक्त करत ती वाढ आणखीन वाढवण्याची मागणी केली.

Related Stories

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यावर श्वेतपत्रिका काढा

Archana Banage

सांगलीतील तरूणाचा कोरोना वॉर्डमध्ये मृत्यू

Archana Banage

रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; दोघा संशयित आरोपींना अटक

Archana Banage

प्रशासनाने पंचगंगेत गणेशमूर्ती विसर्जन करण्यास रोखू नये

Archana Banage

गॅस पाईप लाईन योजनेला कोल्हापूर महापालिकेचा हिरवा कंदील

Archana Banage

वसतिगृहाच्या माध्यमातून महिला सुरक्षेला प्राधान्य – छ. शाहू महाराज

Archana Banage