Tarun Bharat

एसटी प्रवासी संख्या 16 हजाराच्या पार

700 कर्मचारी कामावर हजर

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यामध्ये एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आह़े 17 डिसेंबर रोजी जिह्यात तब्बल 16 हजार 283 प्रवासी नोंद एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून करण्यात आली. फेऱयाच्या संख्या वाढत असतानाच प्रवासी संख्याही चांगलीच वाढली आह़े सर्वाधिक प्रवासी संख्या 4 हजार 778 ही दापोली आगारातून झाल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

  जिह्यात आता एकूण 700 हून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़  दरम्यान, एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, यासाठी संप सुरू असतानाच जिह्यात शनिवारी 300 हून अधिक फेऱया सुरू करण्यात प्रशासनाला यश आल़े सर्वसामान्य लोकांना एसटीच्या फेऱयांबद्दल माहिती होत असल्याने प्रवासी एसटीला पसंती देत आह़े ग्रामीण भागामध्ये खासगी वाहतुकीमधून होणाऱया लुटीमुळे नागरिक हैराण झाले आहेत़ त्यामुळे एसटीचा दिलासा प्रवाशांना मिळत आह़े 

   रत्नागिरी विभागातील 17 डिसेंबरची प्रवासी संख्या

आगार           प्रवासी संख्या

मंडणगड                        177

दापोली              4778

खेड                   1559

चिपळूण             2510

गुहागर                  53

देवरूख              4297

रत्नागिरी                           35

लांजा                   317

राजापूर               2554

एकूण             16283

Related Stories

निवती किल्ल्यावर मराठा आरमार दिन साजरा

Anuja Kudatarkar

10वी निकालाचा सर्व्हर डाऊन

Anuja Kudatarkar

मळगाव रेल्वे ब्रीजखाली मृतावस्थेत सापडलेली ती महिला कोण?

Anuja Kudatarkar

‘लॉकडाऊन मालूम, बिमारी कौनसी नही मालूम।

NIKHIL_N

Ratnagiri : दहावी परीक्षा आजपासून; रत्नागिरीतून 19,199 तर सिंधुदुर्गतून 9,269 विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

Abhijeet Khandekar

कर्ज व्याज परतावामध्ये 50 लाखापर्यंत कर्ज

NIKHIL_N