Tarun Bharat

एसटी संप : दापोली तब्बल 18 कर्मचारी निलंबित

प्रतिनिधी / दापोली

आंदोलनात सहभागी झाल्याचा, लोकांची गैरसोय केल्याचा व न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवून दापोलीतील तब्बल 18 एसटी कर्मचारी यांना निलंबित करण्यात आलेले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून यात वाहक व चालक यांचा समावेश आहे.
दापोलीत 400 एस टी कर्मचारी आहेत. हे सर्व एसटी कर्मचारी दापोली एसटी डेपो मध्ये आंदोलनाला बसलेले होते. त्यांना दोन दिवसांपूर्वी एसटी प्रशासनाने दापोली डेपो मध्ये आंदोलन करण्यास मज्जाव केला व त्यांना दापोली डेपोतून बाहेर जाण्यास सांगितले.

शिवाय महामंडळाच्या विश्रांतीगृहातून देखील बाहेरच्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना काही दिवसापूर्वी तडकाफडकी बाहेर काढण्यात आले. या सर्वांनी ती रात्र दापोली बसस्थानकात थंडीमध्ये उघड्यावर घालवली. सध्या एसटी स्टॅन्ड परिसरात हे सर्व एसटी कर्मचारी दिवसभर फिरताना दिसून येतात. मात्र सध्या बैठे आंदोलन जागे अभावी स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती एसटी कर्मचाऱ्यांनी तरुण भारतला दिली.

Related Stories

रत्नागिरी जिह्यात कोरोनाचे 8 नवे रूग्ण, चाचण्यांमध्येही घट

Archana Banage

ज्ञानकुंज कॉम्प्युटर एज्युकेशन कसाल या संस्थेस बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : आसूदमध्ये दरड कोसळून घरांना धोका

Archana Banage

स्व हरिश्चंद्र बिराजदार मानधन योजना ठरतेय होतकरू मल्लांना आधार.

Patil_p

सरकारला साताऱयातील एसटी कामगारांचा ‘दे धक्का’

Patil_p

“ई पॉस मशीन तुम्हालाच ठेवा” – संतप्त रेशन धान्य दुकानदारांचा पवित्रा

Anuja Kudatarkar