Tarun Bharat

एसटी हिंसाचारप्रकरणी पन्नासपेक्षा अधिक गुन्हे दाखल

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊ केल्यानंतर राज्यातील एसटीची वाहतूक हळूहळू सुरू

ऑनलाईन टीम / मुंबई

एस टी संप अद्याप संपुर्णपणे मिटला नसुन एस टी कर्मचारी शासनाने आपल्या मागण्यांचा गांभिर्याने विचार करुन आमच्या मागण्या मान्य करा अशा मागण्या करत आहेत. यासाठी शासन आणि संपकरी यांच्यात गेले काही दिवस वाटाघाटी सुरु आहेत. यातच मुंबई एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण लागले असून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त गुन्हे एसटी प्रशासनाने नोंदविले आहेत. रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एक हजार १०८ गाडय़ा धावल्या, तर १८ हजार ३७५ कर्मचारी कामावर रुजू झाले.

याबरोबरच काही ठीकाणी एसटीवर दगडफेक झाल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर जळगाव आगारातील एसटी जामनेरला रवाना होत असताना जामनेरच्या दरम्यान 2 वाजता परतीच्या प्रवासात गाडेगाव घाटातील एकाने एसटीच्या काचेवर दगड भिरकावल्याचा प्रकार घडला आहे. तसेच कल्याण-भिवंडी रस्त्यावर ही धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर शनिवारी रात्री अनोळखी व्यक्तीने दगडफेक केली. या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कल्याण बस आगारातील एका चालकाला ताब्यात घेतले आहे.

त्यामुळे संप मागे घ्यायचा अथवा नाही याबाबत एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकसुत्रतेचा अभाव असल्याचे वारंवार जाणवत असुन कमी प्रमाणात का असेना एसटी कर्मचारी कामावर हजर होत असुन यामुळे बस सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र अद्याप ही काही प्रमाणात एसटी कर्मचारीवर्ग शासनाच्या भुमिकेला नापसंती दाखवत माघार घेण्याच्या भुमिकेत नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळ यावर काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Stories

‘सात’ दहशतवाद्यांना कंठस्नान..!

Rohit Salunke

महाराष्ट्रात 3,513 कोरोनाबाधित बरे

Tousif Mujawar

कोल्हापूर : कोरोना पार्श्वभूमीवर म्हासुर्लीत बेकायदेशीर भरलेला बाजार तरुणांनी उधळला

Archana Banage

ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत गगनबावड्याची वैदेही पाध्ये प्रथम

Archana Banage

वीर दास यांचा शो रद्द करण्याची हिंदूत्ववादी संघटनांची मागणी

Abhijeet Khandekar

निवडणूक बिनविरोधी झाल्यास पंधरा लाखांचा जादा निधी देणार : प्रवीण यादव

Archana Banage