Tarun Bharat

एसडीपीआयवरील बंदीपूर्वी सरकार पुरावे गोळा करणार

बेंगळूर/प्रतिनिधी

सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टनंतर 11 ऑगस्टच्या रात्री झालेल्या बेंगळूर हिंसाचारात सोशल सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) च्या कथित भूमिकेमुळे राज्य सरकार त्यावर बंदी घालण्यासाठी केंद्राचा सल्ला घेणार आहे. गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हंटल आहे की याविषयी केंद्राशी चर्चा केली जाईल असे ते म्हणाले आहेत. तसेच त्यांनी मंत्रिमंडळातील दंगलीबाबत गृह मंत्रालय व पोलिसांनी त्वरित कारवाईचे कौतुक केले असल्याचेही ते म्हणाले.

पर्यटनमंत्री सी. टी. रवी यांनी राज्य सरकार एसडीपीआय आणि पीएफआय हिंसक कार्यात सामील झाल्याबद्दल पुरेसे आणि ठोस पुरावे गोळा करेल. त्यानंतरच दोन्ही संस्थांवर बंदी घालण्यासाठी केंद्राशी संपर्क साधला जाईल. असे ते म्हणाले. तसेच त्यांनी कोणत्याही एका घटनेऐवजी राज्यभरात झालेल्या सर्व घटनांशी संबंधित सरकार पुरावे गोळा करेल, त्यानंतरही कारवाई केली जाईल.

मंत्री रवी यांनी सरकार असामाजिक काम करणाऱ्यांवर कारवाई करेल. यासाठी कोर्टासमोर पुरावे सादर करण्यासाठी आम्हाला पुरावे गोळा करावे लागतील असे त्यांनी म्हंटले आहे.

Related Stories

बेळगावात 29 मे रोजी होणार ‘खाण अदालत’

Amit Kulkarni

माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील: संजय राठोड

Archana Banage

कर्नाटक: रामनगर येथे पहिला कचरा ऊर्जा प्रकल्प उभारणार

Archana Banage

कर्नाटक: ६ लाखाहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

Archana Banage

राज्यातील जनतेला ‘शॉक’

Amit Kulkarni

कर्नाटक एसएसएलसीचा निकाल सोमवारी जाहीर होणार: शिक्षणमंत्री

Archana Banage