Tarun Bharat

एसपीएम रोडवर कारच्या काचा फोडल्या

Advertisements

चेहरा लपविलेल्या अज्ञाताकडून रविवारी मध्यरात्री कृत्य

प्रतिनिधी /बेळगाव

घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या कारवर अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. दगडफेकीत कारच्या काचा फोडण्यात आल्या असून एसपीएम रोडवर ही घटना घडली आहे. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

निधी नितीन म्हाडगुळकर यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. केए 22 एमबी 0051 क्रमांकाची टाटा टियागो कार नेहमीप्रमाणे घरासमोर उभी करण्यात आली होती. मध्यरात्रीनंतर स्वतःचा चेहरा झाकलेल्या एका अनोळखीने दगडफेक करून दर्शनी, पाठीमागील व दरवाजाच्या काचा फोडल्या आहेत.

घटनेची माहिती समजताच शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यासंबंधी भादंवि 427 कलमान्वये अज्ञाताविरुद्ध एफआयआर दाखल केला असून चेहरा लपविलेल्या तरुणाचे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे.

Related Stories

अनमोड घाटात वाहन दरीत कोसळले

Amit Kulkarni

लॉकडाऊन काळात शिवारात रंगताहेत पाटर्य़ा

Amit Kulkarni

‘हिरण्यकेशी’ देणार टनाला 2700 रुपये

Patil_p

हमारा देश संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

Amit Kulkarni

मुतगे न्यू इंग्लिश स्कूल एसडीएमसी अध्यक्षपदी आर. वाय. पाटील

Amit Kulkarni

कचरा उचल करण्यासाठी पैशांची मागणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!