Tarun Bharat

एसबीआयकडून कर्ज व्याजदरांवर ‘ऑफर’

वाहन, सोने, गृह कर्जावर विशेष सवलती : प्रोसेसिंग फीमध्ये 100 टक्के सूट : ऐन सणासुदीत ग्राहकांना लाभ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

आगामी काळात येणाऱया सणांच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर दिल्या आहेत. योनो ऍपद्वारे कार, सोने, गृह किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणाऱया ग्राहकांना कोणतेही प्रक्रिया शुल्क द्यावे लागणार नाही. तसेच वाहन कर्जासाठी अर्ज करणाऱया ग्राहकांना किमान 7.5 टक्के व्याजदरासह निवडक मॉडेल्सवर त्यांना 100 टक्के ऑनरोड फायनान्सिंगची सुविधा दिली जाणार आहे.

मंजूर प्रकल्पात घरे खरेदी करणाऱया ग्राहकांना एसबीआय होम लोनवर कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही. या व्यतिरिक्त ही बँक अधिक चांगले पेडिट स्कोर आणि कर्जाची रक्कम असलेल्या ग्राहकांना 0.10 टक्के व्याजदरात विशेष सवलत देणार आहे. या ग्राहकांनी एसबीआयच्या योनो ऍपद्वारे अर्ज केला तर त्यांना आणखीही विशेष सूट मिळू शकते. एसबीआयने गोल्ड लोन घेणाऱया ग्राहकांसाठी किमान 7.5 टक्के व्याजदरावर 36 महिन्यांसाठी सोन्याच्या कर्जाची परतफेड करण्याची सुविधा असेल. तसेच सध्या निर्माण झालेल्या कोरोनाच्या संकटात ग्राहकांना परडवणारी कर्जाची उपलब्धता पाहता एसबीआय 9.6 टक्के दराने वैयक्तिक कर्जाची (पर्सनल लोन) सुविधा देत आहे.

ग्राहकांना अलर्ट

सोशल मीडियाचा वापर लाभदायक असला तरी तितकाच घातक असल्याची शक्मयता नाकारता येत नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात लवकरात लवकर संपर्क साधण्यासाठी सोशल मॅसेंजिंग ऍपचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सऍपचा वापर करणाऱयांसाठी भारतीय स्टेट बँकेने काही अलर्ट जारी केले आहेत. यासंबंधी बँकांकडून ग्राहकांना वेळोवेळी एसएमएस पाठवून सतर्क केले जात आहे.

Related Stories

कुलगाम चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

prashant_c

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानांना 2 ऑक्टोबरपर्यंत दुबईत नो एन्ट्री

Patil_p

नंबी नारायणन प्रकरणी आरोपींना जामीन नाकारला

Patil_p

शेअरबाजारातील अस्थिरता नियंत्रणात

Patil_p

बिहारमध्ये 8 वर्षीय मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या

Amit Kulkarni

युक्रेन संकट : अमेरिकेसोबत रशियाची लवकरच चर्चा

Patil_p