Tarun Bharat

एसबीआयच्या गृहकर्ज व्याजदरात कपात

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशातील सर्वात मोठी बँक ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने शनिवारी व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली. एसबीआयने गृह कर्जावरील (होम लोन) व्याजदरात कपात केल्यामुळे घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुधारित दरानुसार गृह कर्ज आता 6.70 टक्क्मयांपासून सुरू होणार आहे. 30 लाखांपर्यंतच्या गृह कर्जावर आता 6.70 टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. तसेच 30 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंत गृह कर्जावर 6.95 टक्के आणि 75 लाखांपेक्षा अधिकच्या गृहकर्जावर 7.05 टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. बँकेने महिलांसाठी गृह कर्जावर अतिरिक्त 0.05 टक्के सूट देण्याची घोषणाही केली आहे. तसेच योनो ऍपच्या वापरकर्त्यांसाठी देखील विशेष सूट दिली आहे. एसबीआयने योनो ऍप ग्राहकांसाठी 0.05 टक्के आणखी सूट देण्याची तयारी दर्शवली आहे.

Related Stories

भारतात मागील 24 तासात 76,472 नवे कोरोना रुग्ण, 1021 मृत्यू

datta jadhav

केंद्र सरकारच्या धान्य खरेदीत मोठी वाढ

Omkar B

काश्मीर खोऱ्यात 4 दहशतवाद्यांना कंठस्नान; एकाला जिवंत पकडले

datta jadhav

काँग्रेस आमदार अवैध वाळूच्या व्यापारात गुंतलेत; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा आरोप

Abhijeet Shinde

कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयाने अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टला मोठा धक्का

Abhijeet Shinde

चिंता वाढली : बीएसएफच्या आणखी 30 जवानांना कोरोनाची लागण  

Rohan_P
error: Content is protected !!