Tarun Bharat

एस्टेलर अकादमीच्या वास्को केंद्राचे उद्घाटन

प्रतिनिधी /मडगाव

एस्टेलर अकादमीच्या मडगाव आणि पर्वरी केंद्राच्या मोठय़ा यशानंतर, एस्टेलर अकादमीने वास्कोमध्ये आपले केंद्र सुरू केले आहे. एस्टेलर अकादमी वास्को केंद्राचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. या उद्घाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर उपस्थित होते तर सावियो मोसायस हे सन्माननीय अतिथी होते. या कार्यक्रमाला डॉ. एस. टी. पुत्तूराजू एस्टेलर एज्युकेशनल ट्रस्टचे चेअरमन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

एस्टेलर अकादमीचे संचालक योगेंद्रसिंग सिकरवार यांनी वास्को शहरात केंद्र सुरू केल्याने आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘आम्ही मडगाव आणि पर्वरी येथील आमच्या सध्याच्या केंद्रांवरून आशादायक निकाल देत आहोत आणि आत्ता आमच्या वास्को केंद्रावरून देखील चांगला निकाल देण्याची परंपरा कायम ठेवू.

एस्टेलर अकादमी सातत्याने चांगल्या निकालाची परंपरा कायम राखली आहे. 2019 मध्ये सुमुख फळगावकर गोवा बोर्डात बारावीच्या परीक्षेत टॉपर, 2020 मध्ये आकाश कामत – सीबीएसई गोवा बोर्ड राज्य टॉपर, 2020 मध्ये साक्षी हंगरगेकर – एनटीएसई स्टेज 1 गोवा राज्य टॉपर, 2021 मध्ये अभिदा बार्रेटो गोवा राज्य टॉपर. खरं तर अभिदाने 680/720 गुण मिळवून गोव्यासाठी एक नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. जो गोव्यातील कोणत्याही विद्यार्थ्याच्या ‘नीट युजी’ साठी आतापर्यंतचा सर्वोच्च गुण आहे. आम्हाला गोव्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये उच्च पातळीवर घेऊन जायचे आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आणि पॅन इंडिया स्तरावरील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करत आहोत असे योगेंद्रसिंग सिकरवार म्हणाले.

समारंभाचे प्रमुख पाहुणे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरम्हणाले, ‘वास्कोमध्ये स्पर्धात्मक परीक्षांसाठी दर्जेदार शिक्षणाची गरज होती. ही गरज आत्ता एस्टेलर अकादमी तर्फे पूर्ण होत आहे. या संस्थेचे वास्को शहरात स्वागत आहे. स्पर्धात्मक तयारीसाठी आम्हाला अनेक दिवसांपासून संस्थांची उत्सुकता होती आणि ती डॉ पुत्तूराजू आणि त्यांच्या टीमने पूर्ण केली आहे. शिक्षणाच्या उच्च स्तरावर जाण्याची वेळ आली आहे आणि एस्टेलरने आपल्या तरुणांना, आपल्या देशात आणि परदेशातही स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्या पातळीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एस्टेलर, गेल्या 3 वर्षांपासून आपल्या राज्याला नावलौकिक मिळवून दिला आहे आणि आमचे विद्यार्थी परीक्षेत चमकत आहेत. हळूहळू आपण गोव्याला शैक्षणिक हब बनवण्याच्या दिशेने काम केले पाहिजे.’

नव्याने सुरू झालेल्या एस्टेलर वास्को केंद्राला फादर अँथनी वाझ यांनी आशीर्वाद दिला. यावेळी एस्टेलर अकादमीचे संचालक योगेंद्रसिंह सिकरवार यांचा प्रमुख पाहुणे राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. फैजल शेख (महाव्यवस्थापक), फिना लोबो (शाखा प्रमुख) आणि रतीश देसाई (मार्केटिंग प्रभारी) यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे. एस्टेलर अकादमीचे महाव्यवस्थापक फैजल शेख यांनी आभार मानले तर एस्टेलर अकादमीच्या प्राध्यापक आकांक्षा कामत यांनी सूत्रसंचालन केले.

Related Stories

जीवे मारण्याची धमकी देणाऱयांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी

Amit Kulkarni

गोवा मुख्य निवडणूक अधिकारीपदी रमेश वर्मा

Amit Kulkarni

राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय

Patil_p

मडगावच्या विकासासाठी भाजपला संधी द्या

Amit Kulkarni

दाबोळी विमानतळावर पर्यटकांना नऊ लाखांना लुटले

Patil_p

खलाशांविषयी केंद्राच्या निर्णयाचे श्रेय कोणत्याच पक्षाला जात नाही

Omkar B