तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचा-यांचे वेतन पुरेशी रक्कम महामंडळाकडे उपलब्ध नसल्याने देय असलेल्या तारखेस वेळेत वेतन झालेले नाही. महामंडळाच्या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी थकबाकीची रक्कम शासनाकडून २९७ कोटी रूपये येणे होते त्यापैकी २७० कोटी रूपये शासनाने रा.प. महामंडळास दिले आहेत.
महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने शिवशाही, ब्रिक्स यासह कोणत्याही खाजगी कंत्राटदारांची बिले अदा न करता २७० कोटी रूपयांमधून केवळ एसटी कर्मचा-यांचे वेतन करण्याची मागणी केली होती ती प्रशासनाने मान्य केल्याने तसेच कर्मचा-यांचे वेतन देण्यास प्राधान्य दिल्याने उद्या कर्मचा-यांचे पगार होतील.

