Tarun Bharat

एस.टी.महामंडळाच्या वाहकास मारहाण

सातारा तालुक्यातील घटना : दोन युवकांवर गुन्हा, एकास अटक

प्रतिनिधी / सातारा

सातारा तालुक्यातील मोरेवाडीत एस. टी. बस घेवून गेल्यानंतर बस थांबवून प्रवासी उतरवत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या टाकीवरुन वाहकाच्या अंगावर दोन युवकांनी पाणी फेकले. याचा जाब विचारला म्हणून वाहकास मारहाण करुन जखमी करणाऱया केतन नामदेव मोकाशी व सुमित प्रकाश मोरे दोघे (रा. मोरेवाडी, ता. सातारा) यांच्याविरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार झाली आहे. यापैकी एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी सायंकाळी 5.15 वाजता तक्रारदार रणजित हणमंत कुंभार (वय 28, रा. तारळे, ता. पाटण) हे वाहक मोरेवाडीत एस. टी. बस फेरी सोडण्यासाठी चालकासमवेत गेले होते. त्यावेळी गावातील एस. टी. स्टँडवर गाडी थांबवून प्रवाशी उतरत असताना रस्त्याच्या कडेला पाण्याच्या टाकीवर असलेल्या केतन मोकाशी व सुमित मोरे यांनी वाहक कुंभार यांच्या अंगावर पाणी टाकले.

याबाबत जाब विचारल्यावर मोकाशी व मोरे यांनी तू आमच्या गावात आहेस, शहाणपणा करु नको असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच एस. टी. बसमध्ये चढून वाहक कुंभार यांना खाली ओढले. त्यांना जमिनीवर पाडून त्यांच्या डोक्यात बादली मारली. यात कुंभार जखमी झाले अन त्यांना चक्करही आली. गावकरी जमा झाल्यावर त्यांनी मिटवामिटवी करुन गाडी परत पाठवली. कुंभार यांनी तक्रार दिल्यानंतर मोकाशी व मोरे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून यातील सुमित प्रकाश मोरे याला अटक करण्यात आली आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास उपनिरीक्षक फरांदे करत आहेत.

Related Stories

परप्रांतीय मजुरांना भाजपने दिला निरोप

Patil_p

राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची मान उंचावली : पै. बाळासाहेब लांडगे

datta jadhav

वाघेरी येथे बंद घर फोडून पाच तोळे दागिने लांपास

Patil_p

सातारा : पर्यटकांनो जरा दमानं

Archana Banage

सातारा : मांढरदेव घाटातल्या ‘त्या’ खुनाचे रहस्य उलघडेना

datta jadhav

शेतीपंपाच्या वीजबिलाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

datta jadhav