Tarun Bharat

एस. पी. घाळी ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धा उद्यापासून

16 वर्षाखालील टी-25 क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

युनियन जिमखाना आयोजित 16 वर्षाखालील एस. पी. घाळी ज्युनियर लीग टी-25 क्रिकेट स्पर्धा गुरूवारपासून जिमखाना मैदानावर प्रारंभ होत आहे.

सुरेंद्र घाळी यांनी पुढाकार घेऊन ते 16 वर्षाखालील ज्युनियर लीगचे प्रमुख पुरस्कर्ते बनले आहेत. या ज्युनियर लीगमध्ये एकूण 6 संघ मालकांनी भाग घेतला असून, त्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब, व्ही. व्ही. सुपरकिंग्स, रायकर वॉरियर्स, एमसीसी मच्छे, बेलगाम ग्लॅडिएटर्स, स्पार्टन्स बीसीए या संघांचा समावेश आहे. सदर स्पर्धा 10 दिवस चालणार असून 15 साखळी सामने, 3 क्वॉलिफायर सामने व अंतिम सामना असे एकूण 19 सामने खेळविण्यात येणार आहेत.

या सामन्यातील प्रत्येक सामनावीराला व इम्पॅक्ट खेळाडूला दररोज पारितोषिके मिळणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक व मालिकावीर अशी वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मालिकावीर विजेत्या खेळाडूला सायकल बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहिती स्पर्धा सचिव परशराम पाटील व तांत्रिक सचिव मिलिंद चव्हाण यांनी दिली आहे.

Related Stories

शिक्षकांसाठी आजपासून विषयनिहाय कार्यशाळा

Patil_p

बेळगावमध्ये होणार फ्लाईंग स्कूल

Patil_p

पहिल्या रेल्वेगेटनजीकच्या दुभाजकाचा वाहनधारकांना फटका

Amit Kulkarni

साईराज वॉरियर्स, बीसीसी मच्छे संघ विजयी

Amit Kulkarni

सीमाप्रश्नाच्या खटल्याचे कामकाज नियमित सुरू करा

Amit Kulkarni

प्रकाश शिरोळकर यांना जामीन

Omkar B
error: Content is protected !!