Tarun Bharat

एस. व्ही. आर. श्रीनिवास MMRDA आयुक्त; गृहनिर्माण प्रधान सचिवपदी मिलिंद म्हैसकर

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी मिलिंद म्हैसकर, तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (MMRDA) महानगर आयुक्तपदी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आर. ए. राजीव यांचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची वर्णी लागली आहे. या पदाचा अतिरिक्त कारभार तूर्तास अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची या पदावर नियुक्ती झाल्यानंतर सोनिया सेठी यांना त्यांच्याकडे पदाभार सोपवण्यास सांगितले आहे. 


एस. व्ही. आर श्रीनिवास हे 1991 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. एमएमआरडीए महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांना मुदतवाढ नाकारण्यात आल्याने ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती. अखेर एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची त्यांच्या जागी वर्णी लागली. तर मिलिंद म्हैसकर यांची वर्णी एस.व्ही.आर श्रीनिवास यांच्या जागी लागली आहे.


राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती झालेले मिलिंद म्हैसकर हे 1992 च्या बॅचचे अधिकारी आहेत. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. महसूल आणि वन विभागतही प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे.


आर.ए. राजीव हे 28 फेब्रुवारीला निवृत्त झाले होते. त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम केल्याने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मुंबईत सुरु असलेल्या 337 किमी मेट्रो मार्गाचे काम त्यांच्या नेतृत्वात सुरु होते. 

Related Stories

जतचे माजी आमदार मधुकर कांबळे यांचे निधन

Abhijeet Shinde

”ओबीसींना कशाच्या आधारे वैद्यकीय प्रवेशात 27 टक्के आरक्षण दिलं?”

Abhijeet Shinde

“ओबीसींसाठी लढाई लढणाऱ्यांना त्रास दिला जातोय”; पण…

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’ हवे की नको … दोन मतप्रवाह!

Abhijeet Shinde

‘नळ गळती थांबवा पाणी वाचवा’ संकल्प

Patil_p

MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याने पुण्यातील तरुणाची आत्महत्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!