Tarun Bharat

ए. डी. सायंटिफिक इंडेक्सच्या क्रमवारीत कुलगुरूंसह 48 संशोधक

Advertisements

संख्याशास्त्र विषयातील कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के एकमेव संशोधक


प्रतिनिधी / कोल्हापूर

जागतिक पातळीवरील ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-2021' तर्फे जाहीर करण्यात आलेल्या जागतिक संशोधकांच्या अद्यावत क्रमवारीत शिवाजी विद्यापीठातील कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह एकूण 48 वैज्ञानिक, संशोधकांचा समावेश झालेला आहे. या संशोधकांत स्थान प्राप्त करणारे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के संख्याशास्त्र विषयातील एकमेव संशोधक ठरले आहेत. अमेरिकेच्या मिशीगन विद्यापीठातील प्रा. मूरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणेआल्पर-डॉजर सायंटिफीक इंडेक्स’ तथा `ए. डी. सायंटिफिक इंडेक्स’ विश्लेषित केला आहे.

त्यांनी गुगल स्कॉलरवरील संशोधकांचा गेल्या पाच वर्षांतील एच-इंडेक्स, आय-टेन इंडेक्स हे निर्देशांक तसेच सायटेशन स्कोअर (उद्धरणे) इत्यादी बाबींचे पृथक्करण केले. जगातल्या 13,542 शैक्षणिक संस्थांमधील 5,65,553 संशोधकांचा डाटा त्यांनी संकलित केला. कृषी व वने, कला व स्थापत्य, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, कायदे अभ्यास, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान, नैसर्गिक शास्त्रs अशा 256 उपशाखांमधील संशोधकांचा समावेश आहे. त्यातून `वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-2021′ जाहीर करण्यात आले आहे. या क्रमवारीमध्ये विद्यापीठाच्या 48 संशोधकांचा समावेश आहे. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांना मटेरियल सायन्स, सौरघट, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, गॅस सेन्सर आणि नॅनोविज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधनासाठी क्रमवारीत आघाडीचे स्थान प्राप्त झाले आहे.

ए.डी. सायंटिफिक इंडेक्स क्रमवारीत स्थान लाभलेले विद्यापीठातील संशोधक

संख्याशास्त्र- डॉ. डी.टी. शिर्के, पदार्थविज्ञान, मटेरियल सायन्स व धातूविज्ञान- डॉ. पी.एस. पाटील, डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. सी. एच. भोसले, डॉ. आण्णासाहेब मोहोळकर, डॉ. एन. आय. तरवाळ, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. टी. जे. शिंदे (के.आर.पी. महाविद्यालय, इस्लामपूर), डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. ए. बी. गडकरी (गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर), डॉ. विजया पुरी (धातूविज्ञान), डॉ. सोनल चोंदे (धातूविज्ञान व मटेरियल सायन्स) रसायनशास्त्र- डॉ. के. एम. गरडकर, डॉ. एस. एस. कोळेकर, डॉ. ए. व्ही. घुले, डॉ. एस. डी. डेळेकर,

डॉ. जी.बी. कोळेकर, डॉ. डी. एम. पोरे, डॉ. राजश्री साळुंखे, डॉ. एम. बी. देशमुख, डॉ. डी. एच. दगडे, डॉ. गजानन राशीनकर, डॉ. अनंत दोड्डमणी, वनस्पतीशास्त्र- डॉ. एन. बी. गायकवाड, डॉ. एन. एस. चव्हाण, डॉ. डी. के. गायकवाड. जैवतंत्रज्ञान व बायोरिमेडिएशन- डॉ. एस. पी. गोविंदवार, डॉ. ज्योती जाधव, डॉ. नीरज राणे. प्राणीशास्त्र- डॉ. एम. व्ही. शांताकुमार, डॉ. टी. व्ही. साठे. जैवरसायनशास्त्र- डॉ. के. डी. सोनवणे, डॉ. पंकज पवार, डॉ. पी. बी. दंडगे. इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स – डॉ. पी. एन. वासंबेकर (इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स), डॉ. टी.डी. डोंगळे (नॅनो-इलेक्ट्रॉनिक्स), डॉ. आर. आर. मुधोळकर (इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी). नॅनोसायन्स व तंत्रज्ञान- डॉ. एस. बी. सादळे, डॉ. एन.आर. प्रसाद, डॉ. किरण कुमार शर्मा. पर्यावरणशास्त्र-डॉ. पी. डी. राऊत (पर्यावरणशास्त्र), डॉ. विजय कोरे (पर्यावरण अभियांत्रिकी). अन्नविज्ञान व अभियांत्रिकी-डॉ. ए. के. साहू, डॉ. राहुल रणवी. संगणकशास्त्र- डॉ. एस. आर. सावंत. गणितशास्त्र- डॉ. के. डी. कुचे. फार्मसी-डॉ. जॉन डिसुझा (तात्यासाहेब कोरे फार्मसी महाविद्यालय, वारणानगर), संतोष पायघन.

Related Stories

जोगेवाडी धनगरवाड्यावर गारपीठासह मुसळधार अवकाळीचा तडाखा

Abhijeet Shinde

गारगोटीत कंत्राटदाराची कार फोडून जीवघेणा हल्ला

Sumit Tambekar

कोरोना संसर्ग प्रतिबंध आणि उपचारांसाठी वैद्यकीय साहित्य मिळावे : खासदार माने

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती दान करुन सहकार्य करा

Abhijeet Shinde

गोकुळची गरज ओळखूनच जागा खरेदी – चेअरमन विश्वास पाटील

Abhijeet Shinde

कोरोनाच्या लढ्यातील पोलीस नव्या नियमांच्या कात्रीत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!