Tarun Bharat

ए. डी. सायंटिफिक इंडेक्समध्ये विद्यापीठाचे ४८ संशोधक

प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांचा एच-इंडेक्स सर्वाधिक 76

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’तर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या ‘वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-2022’मध्ये शिवाजी विद्यापीठातील 48 संशोधक-प्राध्यापकांचा समावेश आहे. गुगल स्कॉलर सायटेशन्सच्या आधारे प्राफ्त झालेल्या यादीत गतवर्षीच्या संशोधकांनी त्यांचे स्थान कायम राखले आहे. विद्यापीठाने देशातील 2145 संस्थांमध्ये ‘एच इंडेक्स’च्या आधारावर देशात 63 वे स्थान प्राप्त झाले आहे. या यादीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांचा एच-इंडेक्स हा सर्वाधिक म्हणजे 76 इतका आहे. भारतातील मोजक्याच संशोधकांचा इतका मोठा एच इंडेक्स आहे.

एडी सायंटाफिक इंडेक्स (अल्पर-डोजर सायंटाफिक इंडेक्स), जर्नल्स आणि विद्यापीठांचे मूल्यमापन करणाऱया इतर प्रणालींपेक्षा वेगळी आहे. यात शास्त्रज्ञांच्या संशोधनातील कामगिरी आणि वैयक्तिक वैज्ञानिक उत्पादकतेच्या अतिरिक्त मूल्यावर आधारित क्रमवारी आणि विश्लेषण केले आहे. शिवाय शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक वैशिष्ट्य़ांवर आधारित संस्थांची क्रमवारी काढली जाते. शिवाजी विद्यापीठ मटेरियल सायन्स संशोधनात सर्वोत्तम संस्थांपैकी एक म्हणून ओळखले जाते. ही क्रमवारी सर्व विज्ञान विषयांतील संशोधनावर आधा†रत आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के संख्याशास्त्र विषयातील एकमेव संशोधक आहेत.

विद्यापीठातील संशोधकांची नावे
भैतिकशास्त्र-डॉ. पी.एस. पाटील (76), डॉ. के. वाय. राजपुरे (57), डॉ. सी. एच. भोसले (54), डॉ. ए.व्ही. मोहोळकर (52), डॉ. एन. एल. तरवाळ (28), डॉ. आर. जी. सोनकवडे (26), डॉ. व्ही. आर. पुरी (25), डॉ. एस. बी. सादळे (19), डॉ. एम. व्ही. टाकळे (18), डॉ. टी. जे. शिंदे, इस्लामपूर (18), डॉ. ए. बी. गडकरी, गोखले महाविद्यालय, कोल्हापूर (16) रसायनशास्त्र- डॉ. के. एम. गरडकर (40), डॉ. एस. एस. कोळेकर (34) , डॉ. ए. व्ही. घुले (31), डॉ. एस. डी. डेळेकर (31), डॉ. जी. बी. कोळेकर (27), डॉ. डी. एम. पोरे (24), डॉ. आर. एस. साळुंखे (22), डॉ. एम. बी. देशमुख (20), डॉ. जी. एस. राशीनकर (19), डॉ. डी. एच. दगडे (18), डॉ. ए. दोड्डमणी, शाहू महाविद्यालय, कोल्हापूर (11), डॉ. एस. एम. पाटील, गारगोटी (10), डॉ. एन. आर. प्रसाद, जयसिंगपूर (10) जैवरसायनशास्त्र- डॉ. एस. पी. गोविंदवार (67), डॉ. जे. पी. जाधव (45) ,डॉ. के. डी. सोनावणे (19), डॉ. पी. बी. दंडगे (13), डॉ. पी. के. पवार (13), डॉ. नीरज राणे, पुणे (12) इलेक्ट्रॉनिक्स – डॉ. एस. आर. सावंत (27), डॉ. टी. डी. डोंगळे (25), डॉ. पी. एन. वासंबेकर (23), डॉ. आर. आर. मुधोळकर (13) वनस्पतीशास्त्र- डॉ. एन. बी. गायकवाड (15), डॉ. डी. के. गायकवाड (13) प्राणीशास्त्र- (स्व.) डॉ. एम. व्ही. शांताकुमार (16), डॉ. टी. व्ही. साठे (11) पर्यावरणशास्त्र- डॉ. पी. डी. राऊत (16),डॉ. व्ही. कोरे (10), डॉ. एस. चोंदे (10) अन्नविज्ञान व अभियांत्रिकी- डॉ. ए. के. साहू (15), डॉ. आर. रणवीर (14) फार्मसी- डॉ. जे. डिसुझा, वारणानगर (19), डॉ. एस. पायघन (17) संख्याशास्त्र- डॉ. डी. टी. शिर्के (16) गणितशास्त्र- डॉ. के. डी. कुचे (14) नॅनोसायन्स व तंत्रज्ञान- डॉ. किरण कुमार शर्मा (14)

Related Stories

इचलकरंजीत दुचाकीची चोरी, मोबाईल स्नॅचिंग करणारे त्रिकूट अटकेत

Abhijeet Shinde

कुपवाडमध्ये तरुणाची मराठी शाळेच्या आवारात गळफासाने आत्महत्या

Abhijeet Shinde

देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त!

Rohan_P

मुलींच्या जन्मदरात चंदगड अव्वल, कागल पिछाडीवर

Abhijeet Shinde

पुणे : कोरोनामुळे यंदा गणेश विसर्जन मिरवणूक नाही

Rohan_P

नव्या नियमांबाबत ‘गुगल’ सकारात्मक

Amit Kulkarni
error: Content is protected !!