Tarun Bharat

ऐतिहासिक दसरा चौकात रंगला `शाही दसरा’

प्रतिनिधी / कोल्हापूर

ऐतिहासिक दसरा चौकात शुक्रवारी सायंकाळी छत्रपती परिवारासह निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत शाही दसरा सोहळा झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमी पुजन करुन सीमोल्लंघनाचा कार्यक्रम झाला. यानंतर छत्रपती परिवारातील सदस्यांनी समस्त करवीरवासियांना दसऱयाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थितांनीही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे, यशस्वीनीराजे यांना आपटÎाची पाने देत शुभेच्छा दिल्या. सोहळÎाला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते.

नवरात्रौत्सवातील दशमीला दसरा चौकात होणाऱया शाही दसरा सोहळÎात ऐतिहासिक अशी परंपरा आहे. प्रतिवर्षी अभूतपूर्व उत्साहात हा सोहळा होतो. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर गतवर्षी हा सोहळा प्रातिनिधीक स्वरुपात झाला. तर यंदा निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थित मोठÎा उत्साहात शाही दसरा सोहळा झाला. 

दसरा महोत्सव समितीतर्फे ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळÎाची जय्यत तयारी करण्यात आली होती. सायंकाळच्या सुमारास सरकार घराण्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दसरा चौकात हजेरी लावली. सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास करवीर निवासिनी अंबाबाईची पालखी लवाजम्यासह दसरा चौकात दाखल झाली. त्यापाठोपाठ भवानी मंडपातून तुळजाभवानीची पालखीही येथे आली. याठिकाणी करवीर निवासिनीची आरती करण्यात आली.

यानंतर छत्रपती परिवारातील सदस्य शहर वाहतुक शाखेच्या लवाजम्यासह मेबॅक कारमधून दसरा चौकात आले. यावेळी पोलीस बँडने त्यांना मानवंदाना दिली. उपस्थित सरकार कुटुंबातील सदस्यांनीही मानवंदान दिली. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते विधीवत शमी पुजन झाले. यानंतर दूर्गेची आरती करुन सीमोल्लंघन करत सोने लुटले. छत्रपती परिवारातील सदस्य, उपस्थित मान्यवर यांना आपटÎाची पाने (सोने) देत दसऱयाच्या शुभेच्छा दिल्या.

सोहळÎाला माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगांवकर, जि.प. अध्यक्ष राहूल पाटील, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, उद्योजक व्ही. बी. पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर. के. पोवार, भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : पुरबाधित ऊस प्रधान्याने तोडण्यासाठी 21 ला व्यापक बैठक

Archana Banage

साताऱ्यात कॉंग्रेसचे आंदोलन; महिला पदाधिकाऱ्यांनी थापल्या चुलवर भाकऱ्या

Abhijeet Khandekar

यंदा २७ तास गणेश विसर्जन मिरवणूक, पोलिसांनीही धरला ठेका; जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणतात…

Archana Banage

गडहिंग्जल तालुक्यातील 25 गावांची `हद्द’ निश्चित

Archana Banage

कोल्हापूर : अरुण नरके यांची गोकुळच्या मैदानातून माघार

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगधंदे राहणार बंदच

Archana Banage