Tarun Bharat

ऐतिहासिक पुरंदरच्या तहानाम्याची संभाजीराजेंकडून पाहणी

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजस्थानमधील बिकानेर पुराभिलेखागारास भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झाराजा जयसिंग यांच्यामध्ये झालेल्या पुरंदरच्या तहाचा अस्सल तहनामा याठिकाणी जतन केलेला आहे, त्याची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे यांनी विशेषत्वाने ही भेट दिली.

औरंगजेबाने स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी जेव्हा मिर्झाराजा जयसिंगास अफाट फौजेनिशी पाठवले, तेव्हा शिवरायांच्या मावळ्यांनी त्यास शर्थीची झुंज दिली. मात्र जयसिंगाच्या फौजेपुढे आपल्या सैन्याचे होणारे नुकसान रोखण्यासाठी महाराजांनी तह केला.  हा तह `पुरंदरचा तह’ म्हणून इतिहासप्रसिद्ध आहे. या तहान्वये महाराजांना 23 किल्ले व चार लक्ष होन उत्पन्नाचा मुलुख मुघलांच्या स्वाधीन करावा लागला. या तहाची संपूर्ण कलमे असणारा अस्सल तहनामा सुमारे 22 फूट लांबीचा आहे. याच तहावेळी महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीस आगऱयास जावे, असे ठरले होते. त्यानुसार महाराज आगऱयास गेले असता, तिथे काय घडले, हा इतिहास तर महाराष्ट्रातील लहानथोरांस मुखोद्गतच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट, औरंगजेबासमोर दरबारात महाराजांनी दाखविलेला स्वाभिमान व करारी बाणा आणि आगऱयातून शिवाजी महाराजांनी करून घेतलेली ऐतिहासिक सुटका या सर्व घडामोडींचे वर्णन करणारी मुघल दरबारातील जयपूरचा वकील परकालदास याच्या अस्सल समकालीन पत्रांची  देखील संभाजीराजेंनी याठिकाणी पाहणी केली. राजस्थान सरकारने हा अमूल्य ऐतिहासिक ठेवा अत्यंत काळजीपूर्वक व तितक्याच अभिमानाने जपलेला आहे, याबाबत त्यांचे विशेष कौतुक व आभार मानले पाहिजेत, असे प्रतिपादन करीत महाराष्ट्र शासनानेदेखील आपल्या इतिहासाशी संबधित असलेली अशी प्रकाशित व अप्रकाशित कागदपत्रे महाराष्ट्रवासीयांना पाहण्यासाठी देखील उपलब्ध करावीत, अशी मागणी यावेळी केली. यावेळी राजस्थान राज्य पुराभिलेखागाराचे संचालक डॉ. महेंद्र खडगावत उपस्थित होते.

Related Stories

पाणी चोरी, गळतीमुळे 19 कोटींचा फटका:महापालिकेला 70 एमएलडीचा हिशोब लागेना

Kalyani Amanagi

Kolhapur : कोगे येथे बाळेकुंद्री संस्थान पद्धतीने दीपोत्सव साजरा

Abhijeet Khandekar

मनपा कर्मचारी संपाच्या पवित्र्यात; 22 मागण्याबाबत प्रशासनाला अल्टीमेटम

Archana Banage

करवीर तालुका शिवसेनेच्यावतीने पाकिस्तानच्या ध्वजाची होळी

Archana Banage

आनंद महिंद्रा यांच्या ‘फादर्स डे’ निमित्त भावनिक पोस्टवर नेटकरी भावूक

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : राज्य कामगार विमा मंडळाच्या हॅास्पिटलकरीता दहा डॅाक्टरांची नियुक्ती

Archana Banage
error: Content is protected !!