Tarun Bharat

ऐतिहासिक लामणदिव्याची चोरी

Advertisements

पोलिसात नोंद नाही, इतिहासप्रेमींकडून खदखद व्यक्त

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरातील लाल बहादूर शास्त्राr महाविद्यालय ते शनिवार पेठेकडे जाणाऱया रस्त्याच्याकडेला असलेला ऐतिहासिक लामण दिवा अज्ञात चोरटय़ांनी चोरुन नेला. गेल्या पाच दिवसांपूर्वीच हा दिवा चोरुन नेण्याकरता चोरटय़ांनी तळामध्ये मोडतोड केली होती. हाच दिवा मंगळवारी होता. परंतु बुधवारी सकाळी गायब झाल्याचे सातारकरांना निदर्शनास आले. ऐतिहासिक वस्तू सुद्धा साताऱयातून गायब होत असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त होत आहेत.

सातारा शहराला जसे ऐतिहासिक महत्व आहे तसेच शहरातील अनेक ठिकाणी आजही जुन्या वस्तू पहायला मिळतात. त्यापैकी एक लामणदिवा होता. हाच लामणदिवा लाल बहादूर शास्त्राr महाविद्यालय ते शनिवार पेठ जाणाऱया रस्त्याच्याकडेला कित्येक वर्षापासून उभा होता. परंतु गेल्या पाच दिवसांपूर्वी काही समाजकंटकांनी त्या दिव्यांच्या खांबामध्ये छेडछाड केल्याची सातारकरांच्या निदर्शनास आले. त्याचे संवर्धन होणे गरजेचे असताना तो लामणदिवाच गायब झाला असून अज्ञात चोरटय़ाने तो दिवा चोरुन नेला आहे. त्याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही.

Related Stories

इतिहासात प्रथमच भाजपच कार्यालय राजभवनातून चालतंय ; नाना पटोलेंची खोचक टीका

Archana Banage

साताऱ्यात 2 नागरिकांना आज डिस्चार्ज, 103 जणांचे स्वॅब तपासणीला

Archana Banage

नॅशनल चिकन सेंटरमध्ये नोकराने मारला डल्ला

Patil_p

पंकजा मुंडे बंडाचा विचार कधीच करणार नाहीत – चंद्रकांत पाटील

Archana Banage

सातारा : माजगाव लूट प्रकरणातील तीन संशयित बोरगाव पोलिसांच्या जाळ्यात

Archana Banage

शहरी भागात स्मार्ट मीटर बसवावेत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!