Tarun Bharat

ऐनापूर येथे गांजा विकणाऱया दोघा जणांना अटक

कागवाड पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी /बेळगाव

ऐनापूर (ता. कागवाड) येथे गांजा विकणाऱया दोघा जणांना कागवाड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून 600 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून कागवाड पोलीस स्थानकात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

शंकर आप्पाण्णा पारशेट्टी (वय 44), बसाप्पा बाबु पारशेट्टी (वय 43, दोघेही रा. ऐनापूर) अशी त्यांची नावे आहेत. कागवाडचे पोलीस उपनिरीक्षक एच. एल. धर्मट्टी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. ए. ताय्यवगोळ, के. बी. चंडुरी, एस. बी. मुरगोड, बी. एल. व्यापारी, एस. बी. संगोटे, ए. एस. पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिह्यात अंमलीपदार्थ विकणाऱयांविरुध्द पोलिसांनी मोहीम उघडली आहे.

Related Stories

इनरव्हील क्लबच्या स्वस्थम उपक्रमाचा शुभारंभ

Patil_p

कपिलेश्वर रोड-ताशिलदार गल्ली कॉर्नरवर जलवाहिनीला गळती

Amit Kulkarni

आमटे येथे गणेश जयंत्तीनिमित्त मान्यवरांचा सत्कार

Omkar B

गुजरात नवरात्र उत्सव मंडळातर्फे राम मंदिरासाठी भरघोस निधी

Amit Kulkarni

शहराचा पारा घसरला 16.2 अंशांवर!

Amit Kulkarni

जमखंडी येथे रक्तदान शिबिर

Patil_p