प्रतिनिधी/ सातारा
स्वयंपाक बनविण्याकरीता सर्वात महत्वाचा भाग असणारा घटक म्हणजे कांदा. शाकाहारी पदार्थ असो वा मांसाहारी कांदा हा प्रत्येक आहार पदार्थातील महत्वाचा भाग. त्यातच मांसाहारी पदार्थ बनविण्याकरीता आगणारा अविभाज्य भाग म्हणजे कांदा. पण या काद्यानेच सध्या सर्वांच्याच डोळय़ातुन पाणी आणले आहे. कारण नुकतेच याच्या दरात 4 ते 5 रूपयांनी वाढ झाली आहे. ऐन 31 डिसेंबरच्या मुहुर्तावर कांदा महागला आहे.
त्यामुळे सध्या याचे दर 35 ते 40 रूपयांपर्यंत येऊन ठेपले आहेत. ही दरवाढ पाहता अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या खादपर्थांमध्ये कांद्याचा वापरच कमी केला आहे. त्यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस पडल्याने अनेक ठिकाणचे कांदे हे सडले आहेत. त्यामुळे उच्च दर्जाच्या कांद्याकरीता रक्कम ही तितकीच मोजावी लागत आहे. सद्याची ही परिस्थिती पाहता अशाच प्रकारे ही दरवाढ होत असेल तर आणखीन काही दिवसांनी कांदा हा आपल्या आहार पदार्थांमधुन गायब होणार की काय असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण मागच्या वर्षी अशाच प्रकारे कांद्याचा दर हा 100 रूपयांपर्यंत पोहचला होता. ही दरवाढ पाहता गृहिणींचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडुन जात आहे.