Tarun Bharat

ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये सरकारकडून 443 लाख टन धान्याची खरेदी

Advertisements

व्यापारी वर्षातील आकडेवारी सादर, अधिकृत एजन्सींचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू झालेल्या विपणन वर्षात सरकारची धान्याची एमएसपीवर आधारित खरेदी आतापर्यंत (डिसेंबरपर्यंत) 443.49 लाख टनापर्यंत पोहोचली आहे. यामधील अधिकची धान्य खरेदी पंजाब, हरियाणा आणि तेलंगणा या राज्यांमधून करण्यात आली आहे.

यामध्ये चालू विपणन वर्षात ऑक्टोबर ते 26 डिसेंबरच्या दरम्यान पंजाबमधून 186.85 लाख टन, हरियाणामधून 55.30 लाख टन, तेलंगणा 52.88 लाख टन, छत्तीसगड येथून 47.20 लाख टन तर उत्तर प्रदेशमधून 38 लाख टन आणि मध्यप्रदेशातून 15.14 लाख टन धान्य खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत 86,924.46 कोटी रुपयांच्या एमएसपीवरील मुल्यानुसार 47 लाखपेक्षा अधिकच्या शेतकऱयांना लाभ झाला आहे.

2020-21 विपणन वर्ष

(व्यापारी वर्ष)

व्यापारी वर्ष 2020-21 ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान सरकारने 1,68,848 65 कोटी रुपयाच्या एमएसपी मूल्यासोबत 894.32 लाख टन धान्य खरेदी केली होती. यामध्ये 1.31 कोटी शेतकरी लाभार्थी राहिले आहेत.

अधिकृत एजन्सीकडून खरेदी

एमएसपीवर आधारीत धान्य खरेदी ही सरकारी मालकी असणाऱया भारतीय निगम (एफसीआय) सोबत राज्यांतील संघटनांकडून ही धान्य खरेदी करण्यात आली असल्याची माहिती यावेळी दिली आहे.

Related Stories

आरआयएल-एचडीएफसीच्या कामगिरीने सेन्सेक्सची उसळी

Patil_p

कार्यालयीन गाळय़ांच्या मागणीत घट

Omkar B

अन्न प्रक्रिया क्षेत्रातील 29 प्रकल्पांना मंजुरी

Patil_p

अभ्यासासाठी आता इलेक्ट्रॉनिक टॅबलेट

Omkar B

भारती एअरटेलची ऍक्सिस बँकेसोबत भागीदारी

Patil_p

सेन्सेक्समध्ये घसरण -निफ्टी स्थिर

Patil_p
error: Content is protected !!