नाशिक \ ऑनलाईन टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये रुग्णालयाला भेट दीली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्राने ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा सर्वात जास्त साठा महाराष्ट्राला दिला. केंद्र सरकारने व्यवस्थित नियोजन केलं आहे. राज्यानेसुद्धा तसेच नियोजन करावे. महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट ऑक्सिजन मिळाला आहे. त्यामुळे केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रुग्णालयांमध्ये स्वच्छता होणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या अडचणी आहेत. त्यामुळे आता विभागीय आयुक्ताना भेटलो. आठवड्याला दोन जास्तीचे टँकर मागवून घेतली आहे. नाशिकमध्ये रेमडेसिव्हीरचा पुरवठा वाढला पाहीजे. सध्या पीएम केअर फंडातून एकूण 4 ऑक्सिजन प्लांट नाशिकमधून मिळत आहेत. आपल्याला माहिती आहे की देशात सर्वात जास्त ऑक्सिजन मिळाला आहे. जिथे बलशाली नेते तिथे ऑक्सिजन, जिथे बलशाली नेते तिथे रेमडेसिव्हीर अशी परिस्थिती असू नये. उलट रुग्णांच्या संख्येनुसार ही व्यवस्था केली पाहिजे. मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यांकडे लक्ष दिलंच पाहिजे. पण त्यांनी आपल्याच जिल्ह्याकडे नेलं पाहिजे असं करणे योग्य नाही. पावरफुल नेत्यांना विनंती करतो की जास्त रुग्ण असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मदत करणे गरजेचे आहे.
माझ्या परीने जे करता येईल ते मी करतो. केंद्राने ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा सर्वात जास्त साठा महाराष्ट्राला दिला. केंद्र सरकारने व्यवस्थित नियोजन केलं आहे. राज्यानेसुद्धा तसेच नियोजन करावे. महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट ऑक्सिजन मिळाला आहे. केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही. समन्वयाने काम करावे लागणार आहे. उपलब्ध साधनांचा उपयोग कसा करावा याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. केंद्र सरकारने सीरमला 3 हजार कोटी आणि भारत बायोटेकला पंधराशे कोटी दिलेले आहे. त्यामुळे आता लसींचं उत्पादन वाढणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती झाल्यामुळे आपण लसीकरणाची मोहीम राबवू शकतो. लसीच्या उत्पादनाच्या सीमा आपण वाढवल्या आहेत, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.


previous post