Tarun Bharat

ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांचा मृत्यू

नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील घटनेमुळे संतापाची लाट, चौकशीचा आदेश

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी व्यक्त केले दुःख

Advertisements

प्रतिनिधी/ नाशिक

बुधवारचा दिवस महाराष्ट्रासह साऱया देशासाठी घातवार ठरला आहे. महाराष्ट्रातील नाशिक शहरात महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामधील ऑक्सिजन टाकीला अचानक गळती लागल्याने त्याचा पुरवठा बंद पडला आणि व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असणाऱया 24 कोरोना रूग्णांचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संतापाची लाड उसळली आहे. महाराष्ट्र सरकारने चौकशीचा आदेश दिला असून समितीही स्थापन केली आहे.

अंगावर शहारे आणणाऱया या हृदयद्रावक घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गफहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आदी नेत्यांनी दुःख व्यक्त केले. तसेच राज्य शासनाने मफतांच्या नातेवाइकांना पाच लाख रूपयांची तातडीची मदत घोषित केली. नाशिक महानगरपालिकेनेही प्रत्येक मृतामागे 5 लाख रूपये साहाय्याची घोषणा केली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ आणि संताप व्यक्त होत असून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.

Nashik: Medical oxygen gas leaks out from a storage unit, which led to interruption in supply of oxygen to COVID-19 patients at Zakir Hussain Municipal Hospital, in Nashik, Wednesday, April 21, 2021. At least 22 COVID-19 positive patients died due to the leakage. (PTI Photo) (PTI04_21_2021_000147B)

हलगर्जीपणा की तांत्रिक दोष ?

राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना आणि प्रत्येक रुग्णालय ऑक्सिजन मिळविण्यासाठी आटापिटा करत असतानाच या रूग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध असूनही ही अतिदुर्दैवी घटना घडली. 13 किलोलिटर क्षमतेचा ही टाकी  होती. तिला अचाक लागल्याने वायू सर्वत्र पसरला. त्यामुळे रुग्णालय परिसरात हाहाकार उडाला. अग्निशमन दलाच्या जवानानी तातडीने धाव घेत ही गळती थांबविली असली तरी तब्बल अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. परिणामी ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या रुग्णांचा दुर्दैवी मफत्यू झाला. या दुर्घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयाकडे धाव घेत एकच आक्रोश केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह पोलिसही दाखल झाले.

रिफीलिंग करताना दुर्घटना

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, रुग्णालयातील ही ऑक्सिजन टाकी खासगी कंपनीची आहे. या टाकीच्या देखभालीचे आणि रिफिलिंगचे काम सुरू होते. त्यासाठी टँकर आला होता. याच काळात टँकरचा व्हॉल्व्ह बदलताना झालेल्या चुकीमुळे किंवा गडबडीमुळे गळती सुरू झाल्याचे प्रथमदर्शनी समजते. टँकरच्या व्हॉल्व्हमध्ये लिकेज असल्याने ही गळती झाली आणि संपूर्ण ऑक्सिजन टाकीबाहेर पडला. या टाकीला जे व्हेंटिलेटर्स किंवा वायुपुरवठा साधने जोडली होती, त्यांच्यात ऑक्सिजनचा दाब करी कमी होत गेला. त्यामुळे रूग्णांना ऑक्सिजन कमी पडून त्यांचा मृत्यू झाला. प्रथम 22 जण मृत झाल्याचे सांगण्यात आले. नंतर ही संख्या 24 वर गेली. अद्यापही 30 हून अधिक रूग्ण गंभीर स्थितीत असल्याचेही सांगितले जाते. 

एका तासात परिस्थितीवर नियंत्रण

या घटनेनंतर तातडीने रुग्णालयातील अनेक रुग्णांना परिसरातील अन्य रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. तथापि काहीची परिस्थिती चिंताजनक बनल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. तर ही घटना घडल्यानंतर महापालिकेची रेस्क्यू पथक, पोलिसांचे रॅपिड ऍक्शन टीम, तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सुमारे तासाभराने परिस्थितीवर नियंत्रण आल्याचे मांढरे यांनी सांगितले. सध्या गळतीच्या ठिकाणी तांब्याचा पाईप जोडण्यात आला आहे. तसेच हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठाही सुरळीत करण्यात आला आहे, असे प्रशासनाने सांगितले.

नातेवाईकांचा आक्रोश

ही दुर्घटना घडल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश सुरु झाला. महापालिकेचा कारभार योग्य नसल्याचा आरोपही करण्यात आला. अनेक नातेवाईकांनी त्यांचे रुग्ण इतरत्र हलवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे या घटनेला जबाबदार असणाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या नातेवाईकांनी केली आहे.

150 पैकी 131 रुग्ण ऑक्सिजनवर

रुग्णालयातील एकूण 150 रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर होते. त्यापैकी 131 रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या घटनेसाठी जबाबदार असणाऱया व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. या गळतीमध्ये 30 ते 35 रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त करीत शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी  जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

दुःखद आणि दुर्दैवी घटना- पालकमंत्री भुजबळ

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दुपारी घटनास्थळाला भेट दिली. या दुर्घटनेमुळे ते फारच व्यथित झाले. ही अतिशय दुःखद घटना असून करोनाशी लढा सुरू असताना अशी दुर्घटना होणे हे अतिशय दुर्दैवी आहे, असे भुजबळ म्हणाले.या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समितीची स्थापना केली असून यामध्ये एक आयएएस अधिकारी, एक इंजिनिअर आणि एका डॉक्टरचा समावेश आहे. चौकशी झाल्याशिवाय दोषी ठरवता येणार नाही. ते शोधणे गरजेचे आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे ते म्हणाले.

मृतांमध्ये 11 महिला, 11 पुरुष

नाशिक महानगरपालिकेचे हे रुग्णालय आहे. 150 रुग्ण क्षमता असतानाही  इथे 157 रुग्ण होते. त्यापैकी 131जण ऑक्सिजनवर होते. 15 व्हेंटिलेटरवर होते. 157पैकी 63 रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. तर मृतांमध्ये 11 महिला आणि 11 पुरुषांचा मफतांमध्ये समावेश आहे.

दुर्घटना टाळण्यासाठी एसओपी- राजेश टोपे

तांत्रिक कारणामुळे ही घटना घडली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.  याची सखोल चौकशी करण्यात येणार असून त्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. अशा घटना पुढे कधीच घडू नये यासासाठी लिक्विड ऑक्सिजनमधील तज्ञ लोकांकडून एसओपी तयार केली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

निष्काळजीपणाचे बळी- प्रवीण दरेकर

निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? या घटनेला जबाबदार असणाऱयांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घ्यावी, तसेच याप्रकरणी महापालिका आयुक्तांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली.

दोषींना शासन हवेच- राज ठाकरे

ऑक्सिजन गळतीमुळे निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवे. अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

     कसून चौकशी करा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मफत्यूची कसून चौकशी करण्याची मागणी केली. गेल्या 2 महिन्यात महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये घडलेली ही आठवी घटना आहे. या रुग्णालयाच्या सर्व आजारी लोकांची सुरक्षित शिफ्टिंग आणि योग्य उपचाराची व्यवस्था करण्याच्या मागणीसह या घटनेवर त्यांनी दुःख व्यक्त केले.

    आता तरी खबरदारी घ्या-फडणवीस

ऑक्सिजन गळती झाल्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले, ही बाब अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. प्रशासनाने आता तत्काळ गरजूंना मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले पाहिजे. या घटनेची सखोल चौकशी तर होईलच. पण भविष्यात अन्यत्र कुठे अशा घटना घडणार नाहीत, यादृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Stories

भारताची पाकिस्तानला कडक शब्दात समज

Patil_p

देशात दिवसभरात 43 हजार नवे रुग्ण

Patil_p

इंधनाच्या उच्चांकी दरांमुळे शासनाच्या तिजोरीत मोठी भर

Patil_p

कमलनाथ सरकारची आज बहुमत चाचणी

tarunbharat

फेब्रुवारीमध्ये पुन्हा बँक कर्मचाऱ्यांचा संप

Amit Kulkarni

संरक्षणाकरता 5.25 लाख कोटींची तरतूद

Patil_p
error: Content is protected !!